
मालवण : शहरातील वायरी भागात वीज पुरवठ्याची मागणी सातत्याने वाढत आहे. वाढत्या मागणीच्या प्रमाणात गावकरवाडा ट्रान्सफॉर्मरवर लोड वाढला आहे. शिवाय अंतरही लांब होत आहे. त्यामुळे भरडेवाडा, हिंदळेकरवाडा, लायब्ररी शाळा परिसर तसेच वायरी मुख्य रस्ता या भागातील नागरिकांना सायंकाळच्या वेळी कमी दाबाने वीज पुरवठा होत आहे. तरी वायरी भागात नवीन ट्रान्सफॉर्मर बसविण्यात यावा अशी मागणी माजी नगरसेवक आप्पा लुडबे यांनी महावितरणचे उपकार्यकारी अभियंता यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
यावेळी राजन गवंडी, श्रेया लोके, प्रदीप पांजरी, किशोर गवंडी, योगेश तारी, मंदार गाड, गणपत वेंगुर्लेकर, आनंद हिंदळेकर, श्रीकांत वेंगुर्लेकर, सतीश गावकर, आनंद गावकर, उर्मिला नाईक, विरेश चव्हाण, राजश्री हिंदळेकर, गणेश शिरोडकर, दिलीप वराडकर, सुहास हडकर, रामदास नार्वेकर यांच्यासह अन्य नागरिक उपस्थित होते.