तर बंदर जेटीवरील स्टॉल व अन्य सर्व विषयावर बोलावेच लागेल

मोंडकर, तोरसकर या स्वयंघोषित नेत्यांनी समस्याग्रस्त तळाशील गावाला भेट तरी दिली कां ? | शिवसेना दांडी शाखा प्रमुख नरेश कोयंडे यांचा इशारा
Edited by: कृष्णा ढोलम
Published on: July 27, 2025 18:42 PM
views 112  views

मालवण : आमदार निलेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्याकडे कोणतीही समस्या मांडल्यास ती तात्काळ सुटते. जनतेचे प्रश्न प्राधान्याने सोडवले जात असल्याने शिवसेनेकडे जनतेचा ओढा वाढत आहे. जिल्हाप्रमुख म्हणून दत्ता सामंत यशस्वी ठरत आहेत. आमदार निलेश राणे ही दत्ता सामंत यांच्या कामाचे सातत्याने कौतुक करतं आहेत. शिवसेना जिल्हाप्रमुख म्हणून दत्ता सामंत यशस्वी ठरत असल्याने बाबा मोंडकर, विकी तोरसकर यांच्या सारखे स्वयंघोषित नेते स्वतःचे अपयश लपवण्यासाठी दत्ता सामंत यांच्या बद्दल बेताल वक्तव्य करतं आहेत. मोंडकर, तोरसकर यांची पत्रकार परिषद स्वतःचे अपयश लपवण्यासाठी आहे. मात्र यापुढे दत्ता सामंत यांच्यावर टिका करण्याचा प्रयत्न झाल्यास बंदर जेटीवरील स्टॉल व अन्य सर्व विषयावर बोलावेच लागेल असा इशारा शिवसेना दांडी शाखा प्रमुख नरेश कोयंडे यांनी दिला. 

भाजपाच्या पत्रकार परिषदेला शिवसेनेकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. शिवसेना दांडी शाखा प्रमुख नरेश कोयंडे यांच्यासमवेत मंगेश कोयंडे, अरुण तोडणकर, प्रवीण पराडकर, भाऊ मोरजे उपास्थित होते. तळाशील येथे समुद्री अतिक्रमणमुळे गावचे दोन भाग अशी स्थिती असताना हे स्वयांघोषित नेते कुठे होते? आतापर्यंत जनतेचे कुठले प्रश्न सोडवले हे जाहीर करावे. नुसतेच स्वतः नेते म्हणवून घेऊ नये. दत्ता सामंत जिल्हाप्रमुख असल्याने शिवसेना पक्ष वाढवणे हे त्यांचे कर्तव्य आहे. ते काम प्रामाणिकपणे ते करतं आहेत. सोबत जनतेचे प्रश्न आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून सोडवून जनसेवा करतं आहेत.

दत्ता सामंत हे विकासकामांची आश्वासन देतात आणि आमदार नीलेश राणे साहेब ती पूर्ण करतात याला आमिष दाखवणे म्हणत नाही तर जनसेवा म्हणतात. मोंडकर सारख्या स्वयंघोषित राष्ट्रीय नेत्यांना हा विकास कधी समजला नाही. मोंडकर यांनी मालवण जेटी वर जो काही विकास केला तो आम्हाला बोलायला लावू नका. स्वतःचे अपयश लपवण्यासाठी सुरु असलेली बेताल वक्तव्ये थांबवा.

भाजपा जेष्ठ नेते खासदार नारायण राणे साहेब, पालकमंत्री नितेश राणे साहेब, आमदार निलेश राणे साहेब यांच्या नेतृत्वात गतिमान विकास होत आहे. उबाठा गटातून अनेक पक्षप्रवेश होत आहेत. त्यामुळे महायुती भक्कम होत आहे. शिवसेना जिल्हाप्रमुख म्हणून दत्ता सामंत यांचे राजकीय वजन वाढत आहे. असे असताना दत्ता सामंत साहेब नेहमीच सांगतात आम्ही राणे साहेबांचे कार्यकर्ते. त्यांचा निर्णय आम्हाला नेहमीच सर्वोच्च आहे. हीच दत्ता सामंत यांची निष्ठा आहे. त्यामुळे डिपॉझिट जप्त झालेल्या व जिल्हापरिषद निवडणुकीत 500 मते पण मिळू न शकलेल्या मोंडकर यांनी बेताल बडबड थांबवावी. तसेच विकी तोरसकर यांनीही खोटे बोलणे थांबवावे. सेजल परब या भाजपात जाण्यापूर्वी दत्ता सामंत यांना भेटल्या. आम्ही शिवसेनेत येतो पण आमच्या काही मागण्या आहेत त्या पुर्ण झाल्या पाहिजेत. अशी भुमिका त्यांची होती. मात्र आर्थिक मागणी मान्य न झाल्याने त्यांनी भाजपात प्रवेश केला. याबाबत विकी तोरसकर यांनी आम्हाला सविस्तर बोलायला लावू नये. किंबहुना हे खोटे असेल तर गावाच्या मंदिरात येऊन खरे स्पष्ट करावे.

दत्ता सामंत यांचे सामाजिक कार्य मोठे आहे. तळाशील येथील बंधारा उभारणी रूपाने ते जनतेने पुन्हा अनुभवले, अनेक प्रसंगातून सातत्याने दिसन येते. आमदार निलेश राणे यांनी याबाबत कौतुक केले. त्यामुळे दत्ता सामंत यांचे उतुंग सामाजिक कार्य कोणीही कवेत घेऊ शकणार नाही. हे तोरसकर यांनी लक्षात घ्यावे व कवेत घेण्याची भाषा करावी. बोलण्यासारखे खूप आहे. मात्र आम्हाला सय्यम ठेवून बोला ही शिकवण असल्याने. अधिक काही बोलत नाही असेही त्यांनी म्हटले आहे.