
मालवण : मालवणात उबाठाला धक्का बसला असून माजी नगरसेविका सेजल परब, उपशहर प्रमुख संन्मेष परब यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. ठाकरे गटाचा दांडी परिसरात वर्चस्व होते. सेजल परब यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यांच्या भाजपा प्रवेशाने ठाकरे गटाला धक्का बसला आहे.
अजूनही काही पदाधिकारी, माजी नगरसेवक लवकरच भाजपात प्रवेश करणार असल्याची माहिती मिळत आहे. काही दिवसांपूर्वी माजी तीन नगरसेवकांचा प्रवेश होता होता राहिला होता. त्यांच्या आधीच सेजल परब यांचा भाजपात प्रवेश झाला. त्यामुळे त्या तीन नगरसेवकांना देखील भाजपा प्रवेशास ग्रीन सिग्नल मिळाल्याची चर्चा आहे.