
मालवण : सिंधुदुर्ग जिल्ह्यात हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन समाज संघटितपणे व एकोप्याने राहतं असताना लव्ह जिहाद सारख्या घटना जिल्ह्यात घडतं आहेत. आचरा, मालवण व अन्य याठिकाणी गुन्हेही दाखल झाले. मात्र, गुन्ह्याच्या तपासात मोठ्या प्रमाणात दिरंगाई दिसून येते. पोलीस तपासात गतिमानता दिसून येत नाही. तरी याबाबत योग्यती कार्यवाही गतिमान पद्धतीने करावी. आरोपीना कठोर शिक्षा होण्यासाठी कार्यवाही व्हावी. अशी भुमिका विश्व् हिंदू परिषद सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वतीने पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग यांच्याकडे करण्यात आली आहे. विश्व हिंदू परिषद जिल्हा मंत्री संतोष प्रभू यांच्या नेतृत्वात सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले आहे. अशी माहिती विश्व हिंदू परिषद पदाधिकारी विलास हडकर, भाऊ सामंत यांनी मालवण येथे दिली आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, राष्ट्रदोही शक्तिकडून सार्वभौम राष्ट्राला आव्हान देणाऱ्या अनेक योजना आखल्या जातात. त्याची माहिती शासनाकडून अनेकवेळा प्रसारित केली जाते. मुस्लिम समाजाकडून लव्ह जिहाद, लँड जिहाद, व्यापार जिहाद, व्होट जिहाद, याची रचना सर्वदूर लक्षात येत आहे. मालवण तालुक्यातील आचरे पोलीस ठाणे अंतर्गत दाखल गुन्ह्यामध्ये तसेच मालवण पोलीस ठाणे अंतर्गतही काही दिवसापूर्वी दाखल झालेल्या गुन्ह्यामध्ये काही स्थानिक मुस्लिम व्यक्तींकडून या घटना घडल्या आहेत हे निदर्शनास येते. मात्र या गुन्ह्यांचा अपेक्षित तपास झालेले दिसतं नाही. या घटना समाज सुलभतेच्या दृष्टीने चिंता निर्माण करणाऱ्या आहेत. या सर्व प्रकरणांमधून समाजात पोलीस यंत्रणा विषयी अविश्वासाचे वातावरण आहे. तरी या गुन्ह्याच्या तपासात जर दिरंगाई झाली असेल तर यापुढे योग्यती कारवाई व्हावी. तसेच दाखल गुन्ह्यातील आरोपीना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे.
घडलेल्या घटनेत जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर पोलीस यंत्रणेने कठोर कारवाई करावी. गुन्हेगारांचे मनोबल वाढेल व आणि काही अधिक गुन्हे घडणार नाहीत, गुन्हेगारांना बळ मिळणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे. यासाठी पोलीस यंत्रणेने घडलेल्या गुन्ह्यांचा सखोल तपास करून कठोर कारवाई करावी. अशी मागणी विश्व् हिंदू परिषदेचे कार्यकर्ते विलास हडकर यांनी केली आहे.
भाजपा प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, आनंद प्रभू, विलास हडकर, राजू राऊळ, लवू महाडेश्वर, भाऊ सामंत, बाळू देसाई, आप्पा लुडबे, मंदार सरजोशी, सौ. शिल्पा खोत, ऍड समीर गवाणकर, चिन्मय रानडे, अनिकेत फाटक, गणेश चव्हाण, हरेश पडते, सुभाष पुराणिक, रविकिरण तोरसकर, संदीप बोडवे, श्रीराज बादेकर, शांती तोंडवळकर, रत्नाकर कोळंबकर, साईराज नार्वेकर आदी उपस्थित होते.