
मालवण : विविध मागण्यां बाबत आज ह्युमन राईट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शन यांनी मालवण तहसीलदार यांचे लक्ष वेधले. सेतू केंद्रामध्ये ऑनलाईन सुविधा बंद असताना प्रतिज्ञापत्र ऑफलाईन करून घ्यावे. सर्व प्रकारच्या सरकारी पेन्शन योजनेचे उत्पन्न दाखले गांव पातळीवर करून मिळावेत. सन २०१४ पासून काढलेले मराठा दाखले आता रद्द ठरले असल्यामुळे नवीन SEBC Act 2024 नुसारचा दाखला मागितला जातो. त्यानुसार जुना दाखला परत घेवून त्या व्यक्तीला नवीन जी.आर. प्रमाणे दाखला देण्यात यावा. दहावी नंतर प्रवेश घेतेवेळी कोणते दाखले आवश्यक आहेत तसेच बारावी नंतर पुढील उच्च शिक्षणासाठी कोणते दाखले आवश्यक आहेत, याबाबत वरीष्ठ पातळीवर शाळा/कॉलेजमध्ये सुचना व्हाव्यात. या मागण्यांची लवकरात लवकर पूर्तता करावी अशी मागणी करण्यात आली.
यावेळी ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन जिल्हाध्यक्ष सुधीर धुरी, जिल्हा सरचिटणीस अर्जुन परब, मालवण तालुका अध्यक्ष प्रमोद कांडरकर, मालवण संपर्क प्रमुख शिवाजी फाटक, दत्ता मयेकर, अरुण ढोलम आदी उपस्थित होते.