तीन पायांच्या कोंबडीच्या पिल्लाचा जन्म

Edited by: कृष्णा ढोलम
Published on: June 30, 2025 20:11 PM
views 488  views

मालवण : तालुक्यातील काळेथर-देवली येथील भजनीबुवा रवींद्र करलकर यांच्या घरात एका तीन पायांच्या कोंबडीच्या पिल्लाचा जन्म झाल्याने परिसरात कुतूहल आणि चर्चेला उधाण आले आहे. ही आज घडलेली अनोखी घटना ऐकून अनेक ग्रामस्थांनी हे पिल्लू पाहण्यासाठी करलकर यांच्या घरी गर्दी केली आहे.

सकाळी कोंबडीच्या पिल्लाने जन्म घेतला. नेहमीप्रमाणे पिल्लांची तपासणी करत असताना करलकर यांच्या कुटुंबीयांच्या लक्षात आले की यातील एका पिल्लाला चक्क तीन पाय आहेत. जन्मतःच अशा प्रकारची विकृती अत्यंत दुर्मिळ मानली जाते. हे आश्चर्यकारक पिल्लू पाहण्यासाठी लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वच जण उत्सुक दिसत होते. अनेकांनी या पिल्लाचे फोटो आणि व्हिडिओ काढून घेतले आहेत. सध्या हे पिल्लू सुखरूप असून इतर पिल्लांप्रमाणेच तेही सामान्यपणे वावरत असल्याचे करलकर कुटुंबीयांनी सांगितले.