
मालवण : देऊळवाडा मालवण येथील कवटकर घर ते बर्फ फॅक्टरी दरम्यान मालवण स्टॅन्ड ते कसाल रस्त्याला पावसाचे पाणी जाण्याची मोरी सार्वजनिक बांधकाम विभागाने बांधलेली होती. त्या मोरीतून भरडेवाडा व आडवण येथून वाहून येणारे पावसाचे पाणी त्या मोरीतून वाहून जायचे पण आता त्या मोरीच्या तोंडावर मातीचा भराव टाकून ती बुजविण्यात आली आहे. त्यामुळे पावसात तेथील नागरिकांच्या घरांना धोका निर्माण होवू शकतो. तसेच उत्पन्नाची झाडेही उन्मळून पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे ती मोरी खुली न केल्यास त्यास सर्वस्वी जबाबदारी मालवण नगरपालिकेची राहिल असा इशारा ह्युमन राईट्स फॉर प्रोटेक्शन मालवणचे निरीक्षक शिवाजी फाटक यांनी नगरपरिषदला दिला आहे.
निवेदनात निवेदनात म्हटले आहे, वायरी मुस्लीम मोहल्ला ते दिघे डॉक्टर यांच्या घरासमोरून जाणारा रस्ता महाराजा हॉटेल येथील पावसाळयातील पाणी वाहण्याचा मार्ग गटारातून बंद झालेला आहे तो त्वरीत खुला करून देण्यात यावा व गटारातील मातीचे भराव टाकून बुजविलेली गटारे खुली करावीत अशीही मागणी करण्यात आली आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष सुधीर धुरी, तालुकाध्यक्ष प्रमोद कांडरकर, संदेश फाटक, विनोद वेंगुर्लेकर, सुनील फाटक आदी उपस्थित होते.