
मालवण : प्रतिनिधी : व्हिक्टर डांटस लाॅ काॅलेज, कुडाळ यांचे विद्यार्थी व मालवण येथील सहिष्णू पंडित यांनी, एलएलबी २०२४ /२०२५ या शैक्षणिक वर्षात तथा पाच वर्षांच्या कायदे अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षात महाविद्यालयातून प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. मुंबई विद्यापीठ अंतर्गत, पाच वर्षांच्या या कायदे अभ्यासक्रमासाठी महाविद्यालयातून प्रथम श्रेणी व प्रथम क्रमांक असे यश संपादन केल्याबद्दल, सहिष्णू पंडित यांनी व्हिक्टर डांटस लाॅ काॅलेज, कुडाळ यांचे चेअरमन व्हिक्टर डांटस आणि प्राचार्या सौ. शिल्पा मर्गज व महाविद्यालयीन प्राध्यापक वर्ग आणि कर्मचारी, महाविद्यालयीन वरीष्ठ व सह अध्यायी मंडळी यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली आहे.
सहिष्णू पंडित हे, मालवण टोपीवाला हायस्कूलचे माजी शिक्षक कै. श्रीनिवास पंडित व मालवणच्या ज्येष्ठ साहित्यिक वैशाली पंडित यांचे नातू आणि रोझरी इंग्लिश स्कूल मालवणच्या ज्येष्ठ शिक्षिका सौ. फिलोमीना पंडित यांचे चिरंजीव आहेत. त्यांच्या यशाबद्दल सिंधुदुर्ग जिल्हा तसेच मालवणातून अभिनंदन होत आहे.