अंडरग्राउंड विद्युत वहिनीचे चर ठरताहेत त्रासदायक...!

Edited by: कृष्णा ढोलम
Published on: June 09, 2025 18:56 PM
views 226  views

मालवण : वायरी भूतनाथ मंदिर रोड कॉर्नर ते तारकर्ली रस्त्यावर विद्युत वितरण यांनी अंडरग्राउंड विद्युत वहिनी टाकण्या करिता रस्त्यावर मधोमध आडवे चर मारले. परंतु ते चर न बुजावल्याने त्या ठिकाणी मातीचे ढीगारे झाले असून तिथून ये जा करणाऱ्या नागरिकांना, सायकल - मोटारसायकल चालकांना, चारचाकी वाहनाना त्रास होत आहे. या ठिकाणी पावसाचे पाणी साचून अपघात होऊ शकतो त्यामुळे तात्काळ डांबरीकरण करावे अशी मागणी जिल्हा युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष देवानंद लुडबे यांनी केली आहे.

तारकर्ली रस्त्याबाबत आज सार्वजनिक बांधकाम विभागाचे लक्ष वेधले. यावेळी जिल्हा सरचिटणीस अरविंद मोंडकर, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष बाळू अंधारी, तालुकाध्यक्ष जेम्स फर्नांडिस, वायरी उपसरपंच प्राची माणगावकर, योगेश्वर कुर्ले, पल्लवी खानोलकर, पराग माणगावकर, सुरेश तळवडेकर, मयूर तळगावकर, गणेश पाडगावकर, आदी उपस्थित होते. 

 दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, हा रस्ता पूर्ववत करा अथवा आम्ही स्वखर्चाने खडी ओतूनं चरमय खड्डे बुजवणार. सदर रस्त्यावर हल्लीच डांबरीकरण झाले होते. परंतु विद्युत वितरण विभागाने खोदलेल्या भागावर बांधकाम विभागाने तातडीने तें योग्य रित्या बुजवूनं लेव्हल करणं गरजेचे असताना ऐन पावसाळ्यात खोदाई करुन प्रशासकीय  गलथानं कारभार दाखवून दिल्याचे म्हटले आहे.