परप्रांतीय भंगार व्यवसायीकाला अधिवासाची कागदपत्रे..?

सब गोलमाल है..?
Edited by:
Published on: February 09, 2025 11:46 AM
views 2233  views

मालवण : भंगार व्यवसायाच्या निमित्ताने एका  परप्रांतीय व्यक्तीला गावात राहण्यासाठी आधारकार्ड, रेशनकार्डसहित मतदानकार्ड ही ई-कागदपत्रे देण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही घटना मालवण तालुक्यातील गोळवण गावात घडली असून यामुळे चर्चेला उधाण आले आहे. एवढेच नव्हे तर त्या व्यक्तीला शासनाच्या योजनांचा लाभ देखील मिळत आहे.  या प्रकारामुळे गोळवण ग्रामस्थ आक्रमक बनले आहेत. सदर व्यक्ती रोहिंग्या असल्याचा संशय ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.

मालवण तालुक्यातील गोळवणमध्ये एक परप्रांतीय व्यक्ती असून त्याला सरकारी सर्व सवलती मिळत असल्याचे समोर येत आहे. सदर व्यक्ती विरोधात स्थानिक ग्रामस्थ आक्रमक झाले आहे. हिंदुत्ववादी नेते तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांचेही ग्रामस्थ लक्ष वेधणार आहेत. एरवी कुठचीही कागदत्रे, योजनेचा लाभ घेण्यासाठी स्थानिकांना अनेक अटी शर्ती घालण्यात येतात, सहजासहजी योजनांचा लाभ मिळत नाही. मात्र, परप्रांतीय व्यक्तीला काही दिवसातच रेशनकार्ड, आधारकार्डसह शासनाच्या योजनांचा लाभ मिळत असल्याने ग्रामस्थांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. त्यामुळे याची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी जोर धरत आहे.