नितेश राणेंनी घेतली मंत्रीपदाची शपथ

मालवणात जल्लोष
Edited by:
Published on: December 15, 2024 18:51 PM
views 265  views

मालवण : महाराष्ट्र राज्य मंत्रीमंडळाचा विस्तार नागपूर राजभवन येथे करण्यात आला. यावेळी महायुतीचे मंत्री यांचा शपथविधी संपन्न झाला. यावेळी कणकवली विधानसभा मतदारसंघातून आमदारकीची हॅट्रिक करताना मोठया मताधिक्याने विजयी झालेले आमदार नितेश राणे यांनीही मंत्री पदाची शपथ घेताच मालवण भाजपा कार्यालयात जल्लोष करण्यात आला. यावेळी फटाक्यांची आतिषबाजी करताना मिठाई वाटप करण्यात आले. 

यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, कुडाळ मालवण विधानसभा संयोजक तथा जिल्हा बँक संचालक बाबा परब, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, माजी उपनगराध्यक्ष राजन वराडकर, महेश मांजरेकर, आबा हडकर, विजय निकम, दीपक सुर्वे, विरेश पवार, प्रमोद करलकर, नंदू देसाई, माजी नगरसेविका पुजा करलकर, ममता वराडकर, महानंदा खानोलकर, तारका चव्हाण, स्मिता प्रभाळे, नंदिता हडकर, निलेश खोत, विक्रांत नाईक, नारायण लुडबे, महेश वरक, भाई मांजरेकर, चंदू आचरेकर यांसह अन्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थितीत होते.