देऊळवाडा श्री देव नारायण मंदिर ते रामेश्वर मंदिर मार्गांवर पेव्हर ब्लॉक बसविणे कामाचे भूमिपूजन

आ. वैभव नाईक यांच्या माध्यमातून निधी मंजूर
Edited by: कृष्णा ढोलम
Published on: October 13, 2024 16:45 PM
views 176  views

मालवण : मालवण शहर देऊळवाडा येथील श्री देव नारायण मंदिर ते श्री देव रामेश्वर मंदिर मार्गांवर पेव्हर ब्लॉक बसविणे कामाचे ग्रामस्थ शिवाजी म्हापणकर यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.  सदर कामासाठी आमदार वैभव नाईक यांनी निधी उपलब्ध करण्यात आला. यासाठी सुहास वालावलकर, मनोज मोंडकर पुनम चव्हाण, उमेश चव्हाण नीना मुंबरकर, मोहन मराळ यांनी प्रयत्न केले. अशी माहिती देण्यात आली. विकास कामाबाबत नागरिकांनी आभार मानले. यावेळी  शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हा प्रवक्ते मंदार केणी, शहर प्रमुख बाबी जोगी, प्रसाद आडवकर, गणेश चव्हाण, भूषण म्हापणकर, गोपी मालवणकर, किशोर गावकर, महेश जावकर, प्रसाद चव्हाण, गोपी मालवणकर आदी देऊळवाडा ग्रामस्थ उपस्थित होते.