ऐन नारळी पौर्णिमेला सर्जेकोट गावावर शोककळा

Edited by: कृष्णा ढोलम
Published on: August 19, 2024 05:35 AM
views 689  views

मालवण : मालवण तालुक्यातील सर्जेकोट येथून मासेमारीला गेलेली पात नौका आचरा हिर्लेवाडी येथील समुद्रात दुर्घटना ग्रस्त झाल्याची घटना रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली आहे. या दुर्घटनेत तीन मच्छिमारांचा मृत्यू झाला असून एकाला पोहत किनारा गाठण्यात यश आले आहे. मृतात सर्जेकोट सोसायटीचे चेअरमन गंगाराम उर्फ जीजी आडकर यांचा समावेश आहे. आडकर हे चौके हायस्कुल मधून शिक्षक म्हणून सेवानिवृत्त झाले होते. या दुर्घटनेमुळे ऐन नारळी पौर्णिमेला सर्जेकोट गावावर शोककळा पसरली आहे.

सर्जेकोट येथील जीजी आडकर हे काल रात्री आपली मच्छीमारी पातनौका घेऊन समुद्रात मासेमारीला गेले होते. आचरा पिरावाडी येथील समुद्रात समुद्रातील धुक्याने ही नौका पलटी झाली. यावेळी नौकेतील चारही मच्छीमार समुद्रात फेकले गेले. एकाने किनारा गाठला तर तीन जण समुद्रात बुडाले. या सर्वांचे मृतदेह मिळून आले आहेत. ते आचरा ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले आहेत. या दुर्घटनेमुळे मच्छिमारांवर शोककळा पसरली आहे.