
मालवण : मालवण भाजपा तालुकाध्यक्ष पदी धोंडी चिंदरकर तर शहर अध्यक्षपदी बाबा मोंडकर यांची निवड करण्यात आली आहे. निवडणूक पक्ष निरीक्षक प्रमोद रावराणे यांनी या नावांची घोषणा. निवडी नंतर बोलताना नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर म्हणाले, भाजपा कार्यकर्ते गेले अनेक वर्षे मेहनत घेत असल्यानेच कार्यकर्त्यांच्या जोरावरच सर्व निवडणुका जिंकल्या. महिन्या दोन महिण्यात येऊन निवडणुका जिंकता येत नाही. त्यामुळे भाजपा यापूर्वीही ताकदीने उभी आहे आणि यापुढेही तशीच राहील. शत प्रतिशत भाजपासाठी आपले प्रयत्न असल्याचे चिंदरकर यांनी सांगितले.
भाजपा शहर अध्यक्ष आणि तालुकाध्यक्ष निवडीबाबत बैठक कोळंब येथील समर्थ मंगल कार्यालय येथे पक्ष निरीक्षक प्रमोद रावराणे, संध्या तेरसे यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, धोंडी चिंदरकर, बाबा मोंडकर, बाबा परब, विलास हडकर, विजय केनवडेकर, राजू परुळेकर, महेश मांजरेकर, विजय निकम, दीपक सुर्वे, के पी चव्हाण, यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
पुढे बोलताना तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर म्हणाले, भाजपा प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण, खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे यांनी आपल्यावर पुन्हा एकदा तालुकाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली. आजपर्यंत कार्यकर्त्यांच्या जोरावर आणि वरिष्ट नेत्यांच्या मार्गदर्शनाने भाजपा पक्ष वाढीसाठी प्रयत्न केले. आमदार निलेश राणे भाजपामध्ये असताना सर्व अधिकारी दिले होते. ग्रामपंचायत पासून लोकसभा विधानसभा निवडणुका जिंकल्या. यापुढेही शत प्रतिशत भाजपासाठी आपले प्रयत्न असल्याचे चिंदरकर म्हणाले.
शहर अध्यक्ष बाबा मोंडकर म्हणाले, पक्षाने शहरासह वायरी भूतनाथ मतदार संघाची जबाबदारी आपल्यावर दिली. येणारा काळ भाजपासाठी सुवर्णकाळ आहे. भाजपा प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी जिल्ह्याची जबाबदारी घेतल्यानंतर पक्ष वाढू लागला. खासदार नारायण राणे हे भाजपामध्ये आल्यानंतर जिल्ह्यात शत प्रतिशत भाजपा झाली. नारायण, आमदार भाजपचे झाले. कुडाळ मालवण मतदार संघात महायुतीचे आमदार आले. यापुढेही शत प्रतिशत भाजपासाठी आपले प्रयत्न राहतील. महायुती म्हणून पक्षाचे नेते जे निर्देश देतील त्या प्रमाणे काम करणार असल्याचे मोंडकर यांनी सांगितले.
यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत यांनी दोन्ही नवनिर्वाचित लाडाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. जिल्ह्यात जेवढ्या निवडणुका झाल्या त्या भाजपाने जिंकल्या. देशात भाजपाचा झेंडा फडकत असल्याचे सांगितले. यावेळी माजी उपसभापती राजू परुळेकर यांनीही शुभेच्छा दिल्या.