
मालवण : प्राथमिक आरोग्य केंद्र आचरा सिंधुदुर्ग सुर्यग्रहण पाहताना नागरिक तसेच आचरा ब्रिजवर सुर्यग्रहण पहायला खास आलेले रिक्षावाले हे कौतुकास्पद होते. हा कार्यक्रम डाँ. कपील मेस्त्री यांनी आरोग्यसेवक व नागरिकांसाठी घेतला होता. मुलांनी ग्रहण कसे होते याची माहिती घेतली. त्याचप्रमाणे त्यांना माहीती दिली. नागरिकांसोबत ग्रहण आणि अंधश्रद्धा यावर चर्चा केली.
यावेळी अनिसचे प्रधान सचिव नंदकिशोर तळाशीलकर, मांगीरीश सांभारी, बाबू कदम, सिस्टर पालव व तारकर आदी उपस्थित होते. डॉ. कपिल मेस्त्री यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम घेण्यात आला.