चिंदर सडेवाडी प्रशालेचा 'बांधावरची शाळा' उपक्रम

Edited by:
Published on: July 18, 2025 11:26 AM
views 53  views

मालवण : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिंदर सडेवाडी येथील विद्यार्थ्यांनी 'बांधावरची शाळा' हा उपक्रम गोसावी वाडी येथील शेतमळ्यात अनुभवला. प्रशालेतील बहुतांश मुले ही अन्नदाता शेतकरी कुटुंबातीलच आहेत. मात्र शाळेतील सर्व विध्यार्थी, शिक्षक, पालक यांच्या एकत्रित सहभागातील हा अनुभव सर्वांसाठी अनोखा व आनंददाई असाच ठरला. शाळा मुख्याध्यापिका सौ. शुभांगी लोकरे-खोत, शिक्षिका अन्नपूर्णा गायकवाड तसेच पालकवर्ग यांच्या सोबतीने आनंदाने मुले शेतात जमा झाली. 

शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष किरण कांबळी सौ. प्रीती कांबळी,  सौ. करिष्मा कानविंदे, सौ सुहासिनी गोसावी, धनश्री गोसावी , मानसी गोसावी, सौ स्वरा घागरे सौ आराध्य कांबळी,  शेतकरी श्री. जयेश गोसावी, संतोष गोसावी, श्री. शामराव गोसावी. सौ शैलेजा गोसावी  व इतर पालक वर्ग यांच्या सहकार्यातून नेहमीचे प्रशालेचे सर्व उपक्रम यशस्वीपणे केले जातात. त्याच धर्तीवर हा उपक्रम यशस्वी ठरला. 

शेतकरी अन्न पिकावतात, आपले पोषण करतात. शेतकरी आपले मित्र आहेत. ही आपुलकीची, आदरांची भावना सर्वच मुलांमध्ये असावी. तसेच सर्व मुलांना प्रत्यक्ष शेतीबाबत माहितीही मिळावी या हेतूने विद्यार्थ्यांसोबत बांधावरची शाळा हा उपक्रम राबवला. शेतकऱ्यांशी संवाद साधतं माहिती जाणून घेण्यात आली. भात लावणी तसेच शेती बाबत प्रत्यक्ष अनुभव सर्वच मुलांनी एकत्रित अनुभवला. शाळा व्यवस्थापन समिती, शेतकरी या सर्वांच्या सहकार्यातून उपक्रम यशस्वी झाला.