
मालवण : परतीचा पाऊस गेला असं म्हणत असतानाच मालवणात आज 8 वाजण्याच्या सुमारास पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. गेले दोन दिवस प्रचंड उष्मा होता. पाऊस पडल्यामुळे हवेत गारवा निर्माण झाला आहे. या पावसामुळे मात्र भात शेतीचे नुकसान होतं आहे. गेले अनेक दिवस ऐन भात कापणीच्या वेळी पाऊस कोसळत असल्याने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होतं आहे. कृषी विभागाने याचे तातडीने पंचनामे करावे अशी मागणी शेतकऱ्यांकडून होतं आहे.