तुळस पलतडवाडीत जल जीवन मिशनच्या कामात गैरव्यवहार | अर्चना घारेंचा आरोप

Edited by: दिपेश परब
Published on: August 02, 2023 19:21 PM
views 98  views

वेंगुर्ला : तुळस-पलतड येथील जलजीवन मिशन अंतर्गत बांधण्यात आलेल्या पिण्याच्या पाण्याच्या विहिरीची पहाणी कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब यांनी केली. यावेळी या विहीरीच बांधकाम निकृष्ट दर्जाचे असल्याचे आढळून आलं. ग्रामस्थ, ग्रामपंचायत सदस्य वारंवार आवाज उठवून देखील याकडे अधिकार लक्ष देत नाहीत. हे अधिकारी का ऐकत नाहीत ? यांना पाठीशी कोण घालत ? हा प्रश्न आहे. या कंत्राटदारावर गुन्हा दाखल झाला पाहिजे. तसेच त्यांना पाठीशी घालणाऱ्यांची चौकशी केली जात संबंधितांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब यांनी केली आहे.

तर हे काम १५ ऑगस्टच्या आत न सुधारल्यास स्वातंत्र्य दिनी उपोषणाला बसणार असा इशारा नम्रता कुबल यांनी दिला आहे. दरम्यान, यापूर्वी अजून एक तक्रार झाली आहे. हा दुसरा प्रकार आहे. विहीरीच काम निकृष्ट दर्जाचे असून अधिकारी दखल घेत नाही आहेत. संबंधित विभाग याची माहिती देण्यास टाळाटाळ करत आहे. यावर कारवाई झाली नाही तर सर्व ग्रामस्थ उपोषणाला बसतील, त्यांना आम्ही पाठिंबा देऊ अस मत राष्ट्रवादीचे वेंगुर्ला तालुकाध्यक्ष योगेश कुबल यांनी व्यक्त केले.

यावेळी यावेळी प्रदेश महिला सचिव नम्रता कुबल, शहराध्यक्ष सत्यवान साटेलकर, तुळस गावचे अध्यक्ष अवधूत मराठे, संपदा तुळसकर, सुजाता पडवळ आदि उपस्थित होते.