मळगांवचे जेष्ठ पुरोहित आबा भटजी यांचे निधन..!

Edited by: विनायक गावस
Published on: November 19, 2023 11:23 AM
views 217  views

सावंतवाडी : मळगांव गावचे जेष्ठ पुरोहित वामन पुरुषोत्तम जोशी तथा आबा भटजी यांचे आज रविवारी पहाटे निधन झाले. ते ७२ वर्षांचे होते. सोनुर्ली मळगांवच्या देवस्थानात ते मानकरी होते. संगीत व भजनाची त्यांना आवड होती. काही नाटकांमध्येही त्यांनी भूमिका केल्या होत्या. त्यांच्या निधनामुळे हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, मुलगी, भाऊ, वहिनी, पुतणे, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे.