
सावंतवाडी : मळगाव माता रमाई डाॅ. आंबेडकर नगर (जाधव वाडी) येथे भल मोठ झाड पडल होतं. तीन दिवस झाले तरी प्रशासनाने कोणतीही दखल घेतली नव्हती. भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी सावंतवाडी प्रशासनाच लक्ष वेधताच सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील यांनी रात्री मळगाव माता रमाई डाॅ आंबेडकर नगर येथे प्रत्यक्ष पाहणी केली. ग्रामपंचायत मळगाव सरपंच यांना आजच रस्ता खुला करून द्या, असे सांगितले.
यावेळी जिल्हा अध्यक्ष भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा सिंधुदुर्ग चंद्रकांत जाधव, मळगाव सरपंच स्नेहल जामदार, ग्रामपंचायत सदस्य सोनल सावळ,ग्रामपंचायत सदस्य स्वारूपा राऊळ, पोलीस पाटील रोशनी जाधव, माता रमाई डाॅ आंबेडकर नगर मधिल ग्रामस्थ उपस्थित होते.