गावाचा शाळेच्या विकासासाठी हातभार असावा : प्रसाद देवधर

सोलार प्रकल्प राबविणारी मळगाव सिंधुदुर्गातील पहिलीच शाळा
Edited by: विनायक गांवस
Published on: June 17, 2024 08:24 AM
views 67  views

सावंतवाडी : शाळा हे एक मंदिर आहे‌. तुम्हाला दान करायच असेल तर या शाळेच्या समस्यांसाठी दान करा, शाळा ही एका व्यक्तीशी किंवा संस्थेशी निगडीत नसून संपूर्ण गावाचा शाळेच्या विकासासाठी हातभार असावा असे प्रतिपादन भगीरथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रसाद देवधर यांनी मळगाव येथे केले. सौरऊर्जा प्रकल्प कार्यक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते.मळगाव ऐक्यवर्धक संघ, मुंबई संचलित मळगाव इंग्लिश स्कूल मळगाव या हायस्कूलमध्ये सौरऊर्जा प्रकल्प राबविण्यात आला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सोलार प्रकल्प राबविणारी ही पहिलीच शाळा आहे. 

भविष्याच्या दृष्टिकोनातून सोलार प्रकल्पाची अत्यंत गरज आहे. वाढता विजेचा वापर यामुळे भरमसाट येणारे बील यामुळे अनेक आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागते. या गोष्टीचा विचार करून या प्रशालेत हा सोलार प्रकल्प राबविण्यात आला. या सोलार प्रकल्पाचे उदघाटन  प्रसाद देवधर यांच्या हस्ते तसेच त्यांनी सुचविल्याप्रमाणे प्रशालेची विज्ञान विषयाची आवड असणारी विद्यार्थिनी निधी राऊळ हिच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष व मळगाव ऐक्यवर्धक संघाचे सचिव आर. आर. राऊळ, संस्था सदस्य रामचंद्र केळुसकर, स्कूल कमिटी चेअरमन मनोहर राऊळ, संस्था सल्लागार अँड. विरेश राऊळ, प्रशालेचे मुख्याध्यापक मारुती फाले, स्कूल कमिटी सदस्य गुरुनाथ नार्वेकर, स्कूल कमिटी शिक्षण सल्लागार तथा प्रशालेचे माजी मुख्याध्यापक दिवाकर राऊळ, मळगाव इंग्लिश स्कूल मळगाव माजी विद्यार्थी परिवार संघाचे अध्यक्ष शेखर पाडगावकर, सचिव महेश गावकर, प्रशालेचे सहाय्यक शिक्षक ओमप्रकाश तिवरेकर, प्रशालेचे पर्यवेक्षक सुनील कदम, माता पालक संघाचे नेहा नाटेकर, सदस्य दीपक जोशी, बिबवणे हायस्कूलचे माजी कला शिक्षक विलास मळगावकर, प्रसाद नाईक, गुरुनाथ गावकर तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी पालक आदी उपस्थित होते.

 श्री. देवधर यांनी सोलार एनर्जी बद्दल विद्यार्थ्याने बरेच मार्गदर्शन केले. सोलार कसा चालतो, त्याचा उपयोग काय याबद्दल विशेष माहिती दिली. आर. आर. राऊळ यांनी दानशूर व्यक्तींमुळेच हा प्रकल्प राबविण्यात आला व तो पूर्णत्वास नेण्यात आला. या सर्वाची वेळोवेळी मदत होत असते. यामुळे अनेक आर्थिक समस्या सोडवता येतात. त्यांचे कौतुक करणे कमी पडेल एवढे ऋण या संस्थेवर या दानशूर व्यक्तींचे आहेत. या सर्व दानशूर व्यक्तींचे व सोलार प्रकल्पसाठी मदत करणारे लिओ बार्न्स संस्था , भगीरथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रसाद देवधर, झारापकर तसेच राव यांचे विशेष आभार मानले. 

दिवाकर राऊळ यांनी भविष्याच्या दृष्टीने सोलार किती महवाचा आहे हे सांगितले.तर शेखर पाडगावकर यांनी सोलार प्रशालेला किती गरजेची व महत्वाची होती हे सांगून याकामी प्रकल्पासाठी पुढाकार घेणारे आर. आर. राऊळ यांचे आभार मानले. प्रकल्पासाठी संस्थेचे सचिव आर.आर. राऊळ यांनी पुढाकार घेऊन हे काम पूर्णत्वास नेले. तसेच या कामी स्कूल कमिटी चेरमन मनोहर राऊळ व प्रशालेचे संगणक निर्देशक रितेश राऊळ यांनीही मदत केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशालेचे मुख्याध्यापक मारुती फाले, सूत्रसंचालन ओमप्रकाश तिवरेकर तर आभार प्रदर्शन सुनील कदम यांनी केले.