मळगाव हायस्कूल इथं शाळा कॉलेज ते शेतकरी बांध उपक्रम

Edited by: विनायक गावस
Published on: July 09, 2023 15:11 PM
views 197  views

सावंतवाडी : शेतकरी निसर्गाचा खरा मित्र आहे. त्याचे जमिनीशी असणारे नाते आई व मुलासारखे असते. मेहनत करुन तो तिच्यातून धान्य पिकवतो. त्यामुळे शेतकरी जगाचा खरा पोशिंदा आहे. पण या शेतीपासून युवा वर्ग दूर जात आहे. या युवा वर्गाला शेतीकडे आकृष्ट करण्यासाठी माजगाव सहयोग मंडळाचा उपक्रम कौतुकास्पद आहे. अशा उपक्रमातून युवक शेतीकडे सकारात्मक दृष्टीने पाहिलं असा उपक्रम राज्यभर राबविण्याची खरी गरज असून यासाठी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे लक्ष वेधण्यात येणार असल्याच मत भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी व्यक्त केले.

सहयोग ग्रामविकास मंडळ, गरड माजगाव तर्फे मळगाव हायस्कूल येथे आयोजित केलेल्या शाळा कॉलेज ते शेतकरी बांध उपक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. या उपक्रमाचे उद्घाटन तेली यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी युवराज लखमराजे भोसले हे होते. अध्यक्ष स्थानावरून बोलताना युवराज भोसले म्हणाले, शेती पिकासाठी खूप मेहेनत घ्यावी लागते. शेतकऱ्यांनी नव्या तंत्राचा अवलंब केला पाहिजे. आपल्या जिल्ह्यातील पर्यटन बहरत आहे. त्यामुळें शेतीच्या जोडीने दुसरा शेती पूरक व्यवसाय केल्यास निश्चितच आर्थिक क्रांती घडेल. यासाठी आतापासूनच युवकांमध्ये आवड निर्माण झाली पाहिजे. अशा उपक्रमातून युवकांचे शेतीशी असणारे नाते अधिक घट्ट होईल, अस ते म्हणाले.

यावेळी व्यासपीठावर पंचम खेमराज महाविद्यालयाचे प्राचार्य डी एल भारमल, माजगाव सहयोग मंडळाचे अध्यक्ष प्रा. दिलीप गोडकर, मळगाव ऐक्यवर्धक संस्थेचे संचालक रामचन्द्र केळुस्कर,सहा, गटविकास अधिकारी चव्हाण, मळगाव सरपंच सौ. स्नेहल जामदार, माजगाव सरपंच डॉ. सौ. अर्चना सावंत, माजी जि. प. सभापती गुरुनाथ पेडणेकर, माजी सभापती राजू परब, माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे, गजानन नाटेकर, आबा केसरकर, नंदू गावडे, भोसले पॉलिटेक्निक फार्मसी चे प्राचार्य जगताप, मळगाव उपसरपंच पेडणेकर, कळसुलकर माजी विद्या्र्थि संघाचे गोठोस्कर, तळवडे हायस्कूल मुख्याध्यापक देसाई, मंडळाचे पदाधिकारी टोपले, अण्णा देसाई, प्रा. गोवेकर, आदी उपस्थित होते.