
मालवण : मालवण नगरपरिषदेची सार्वत्रिक निवडणूक 2 डिसेंबर रोजी होणार आहे. नगराध्यक्ष पदासह 20 नगरसेवक पदांसाठी ही निवडणूक होत आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षाच्या वतीने इच्छुक उमेदवारांचे मागणी अर्ज शुक्रवार 7 डिसेंबर रोजी मालवण येथील पक्ष कार्यालयात सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, मालवण शहर प्रमुख दिपक पाटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत भरणा करून घेतले जाणार आहेत. तरी इच्छुक उमेदवारांनी वेळेत उपस्थित राहून आपल्या उमेदवारी बाबत मागणी अर्ज भरणा करावेत असे आवाहन शिवसेना पक्ष संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.











