
देवगड : एआय हे भविष्यातील तंत्रज्ञान असुन , त्याचा उपयोग करून शासकीय सेवा अधिक कार्यक्षम बनवा असे आवाहन गटविकास अधिकारी अरूण चव्हाण यांनी केले. जिल्हा परिषद सिंधुदुर्ग व पंचायत समिती देवगड यांच्या संयुक्त विदयमाने एआयबाबत दोन दिवशीय प्रशिक्षण गटविकास अधिकारी अरूण चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती संभाजी महाराज सभागृहात संपन्न झाले.
या प्रशिक्षणात मास्टर ट्रेनर ग्रामपंचायत अधिकारी महेश चव्हाण, वरिष्ठ सहाय्यक आरोग्य विभाग भुषन तारी, कनिष्ठ सहाय्यक शिल्पा सावंत, कनिष्ठ सहाय्यक ऋतुराज तळवणेकर, शिक्षक शितल देवरकर, शिक्षक किरण पवार यांनी कृत्रिम बुद्धीमत्तेचे महत्व, त्याचा विविध क्षेत्रातील वापर, तसेच शासकीय कामकाज व जनतेच्या सोयीसाठी होणाऱ्या अंमलबजावणीबाबत मार्गदर्शन केले. तसेच ग्रामपंचायत अधिकारी महेश चव्हाण यांनी कृत्रिम बुद्धीमतेवर आधारीत विविध अॅप्लिकेशनची माहीती देत त्यांनी प्रत्येक कर्मचाऱ्यांकडून त्यांच्या वापराबाबत प्रात्यक्षिक घेऊन प्रत्यक्ष मार्गदर्शन केले . तसेच सहभागीच्या शंकाचे समाधान केले.
या प्रशिक्षणात सहाय्यक गटविकास अधिकारी दिगंबर खराडे, कक्ष अधिकारी संतोष बिर्जे, अधिक्षक कुणाल मांजरेकर, अधिक्षक मेधा राणे, विस्तार अधिकारी दीपक तेंडुलकर, विस्तार अधिकारी तुषार हळदणकर, विस्तार अधिकारी कृषी विलास कोलते, कनिष्ठ सहाय्यक दीपक मयेकर, तालुका समन्वयक सिमा बोडेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
या प्रशिक्षणात देवगडातील विविध विभांगातील अधिकारी, सरपंच, शिक्षक, ग्रामपंचायत अधिकारी, आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशा, डाटा ऑपरेटर आदींनी सहभाग घेतला.
या प्रशिक्षणांमध्ये सुत्रसंचलन विस्तार अधिकारी ( ग्रामपंचायत ) दीपक तेंडुलकर तर आभार सहाय्यक गटविकास अधिकारी दिगंबर खराडे यांनी मानले.










