मकरंद पटवर्धन यांचा सायकलदोस्त सन्मानाने गौरव

Edited by:
Published on: May 16, 2025 16:58 PM
views 62  views

रत्नागिरी : येथील लहान मुलांमध्ये सायकलची गोडी लावण्यासाठी प्रभावीपणे काम करणारे रत्नागिरी सायकलिस्ट क्लबचे मकरंद पटवर्धन यांना बाळगोपाळांचा सायकलदोस्त सन्मान प्रदान करण्यात आला. किड्स सायक्लोथॉननिमित्त हा सन्मान माळनाका येथील तारांगण येथे सुवर्णसूर्य फाउंडेशनच्या संकल्पनेतून प्रदान केला.

पटवर्धन यांनी कोरोना कालावधीपासून दररोज सायकलिंगला प्रारंभ केला. गेल्या चार वर्षांत त्यांनी जवळपास ८००० किमी. सायकलिंग केले आहे. कोरोना काळामध्ये मिऱ्या बंदर येथे दररोज सायकलिंग करताना त्यांनी जोशी पाळंद, टिळक आळी, खालची आळी, मांडवी, भागातील बालदोस्तांनाही सोबत नेलं आणि त्यांना सायकलिंगचा गोडी लावली. सुरवातीला मुलगा अर्णव आणि नंतर सर्व बालदोस्त मंडळी मिऱ्या येथे सायकलिंग करू लागले. वाहतुकीचे नियम पाळून सायकलिंग कसे करावे, कुठलीही दुखापत न होता सायकल कशी चालवली पाहिजे याचे धडे त्यांनी मुलांना दिले. याकरिता सुवर्णसूर्य फाउंडेशनचे संचालक प्रसाद देवस्थळी यांनी हे सन्मानपत्र तयार केले. 

याप्रसंगी रत्नागिरी सायकलिस्ट क्लबचे महेश सावंत, डॉ. नितीन सनगर, दर्शन जाधव, विनायक पावसकर, ओंकार फडके, राकेश होरंबे, डॉ. राज कवडे, अमित पोटफोडे, सुहास ठाकुरदेसाई, धीरज पाटकर, विशाल भोसले, योगेश मोरे, संदीप पावसकर, नारायण पाटोळे, गजानन भातडे, आरती दामले, मृणाल वाडेकर, रुद्र जाधव, सचिन नाचणकर, नीलेश शहा, ओंकार कांबळी, प्रा. बाबासाहेब सुतार, समीर धातकर, केदार देवस्थळी, प्रसाद हातखंबकर, श्रीलेश शिंदे आदी आणि बालदोस्त, पालक उपस्थित होते.