
सावंतवाडी : ग्रामपंचायत माजगांव येथे आज सकाळी ८ वाजता स्वच्छता हि सेवा हा उपक्रम राबविण्यात आला. तसेच १ ऑक्टोबर २०२३ रोजी जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी सावंतवाडी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी वासुदेव नाईक , सावंतवाडी पंचायत समितीचे माजी सभापती अशोक दळवी, माजगाव सरपंच डॉ. अर्चना सावंत, ग्रामपंचायत सदस्य संजय कानसे, ज्ञानेश्वर सावंत, श्रीम. मधू कुंभार, श्रीम. गीता कासार, श्रीम. उर्मिला मोर्ये, श्रीम.माधवी भोगण, श्रीम. प्रज्ञा भोगण, श्रीम.विशाखा जाधव आदि सदस्य तसेच देवस्थान कमिटीचे अध्यक्ष आनंद सावंत, गावचे प्रमुख आर.के. सावंत, नारायण सावंत गुरुजी, भालेकर गुरुजी व माजगाव गावातील ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.
या कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिकांनी आपले विचार मांडले. या कार्यक्रमात गटविकास अधिकारी यांनी ज्येष्ठ नागरिकांना स्वच्छतेसंदर्भात व त्यांच्या आरोग्यासंदर्भात मार्गदर्शन केले. कार्यक्रमासाठी क्षेत्रीय अधिकारी कमलाकर ठाकूर यांनी मोलाचे सहकार्य केले.