
सावंतवाडी : ७० लाखाच्या नळ पाणी पुरवठा योजनेसह माजगाव गावात एक कोटींच्या विकास कामांचा शुभारंभ भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्याहस्ते करण्यात आला. जिल्हा वार्षिक योजनेतून व जल जीवन मिशन योजनेअंतर्गत मंजूर कामांचा आज शुभारंभ करण्यात आला.
हरसावंतवाडा जिल्हा परिषद शाळा नंबर ३ ते भोगणे घरापर्यंत रस्ता मजबुतीकरण पाच लाख रुपये, गुलाबी तिठा ते सुभेदार रस्त्याला गटार बांधणे पाच लाख रुपये, गुलाबी तिठा ते सुभेदार रस्ता तयार करणे व रस्त्याला गटार बांधणे पाच लाख रुपये, कुंभारवाडा ते ख्रिश्चनवाडा रस्ता मजबुतीकरण करणे आणि गटार बांधणे १५ लाख रुपये अशा एकूण एक कोटींच्या कामांची भूमिपूजने राजन तेली यांच्याहस्ते झाली. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी, भाजपचे प्रवक्ते संजु परब, माजगांव सरपंच सौ.अर्चना सावंत, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. रेश्मा सावंत, आनंद नेवगी, मनोज नाईक, उपसरपंच बाळा वेजरे, रिचर्ड डिमेलो, भाजप किसान मोर्चा जिल्हा चिटणीस अजय सावंत, श्याम कासार, ग्रामविकास अधिकारी संदीप गोसावींसह सर्व ग्रा.पं.सदस्य उपस्थित होते.