
सावंतवाडी : भाजप युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांच्या संकल्पनेतून पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य व्यवस्थेची परिस्थिती लक्षात घेवून मोफत रूग्णवाहिका दिल्या जाणार आहेत. पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे. यानिमित्ताने मुख्य मार्ग वाहतुकीसाठी बंद केल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
हा रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा 26 सप्टेंबर सायं ठीक 4 वाजता श्रीमंत शिवरामराजे भोसले पुतळा व केशवसुत कट्यानजिक, मोती तलाव, सावंतवाडी येथे आयोजित करण्यात आला. पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत रूग्णवाहिका दिल्या जाणार आहेत. स्वतः रविंद्र चव्हाण या कार्यक्रमाला उपस्थित रहणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे. यानिमित्ताने भव्य स्टेज उभारण्यात येत आहे. यामुळे गार्डन ते शिवरामराजे पुतळा हा रस्ता वाहतुकीसाठी ब्लॉक करण्यात आला असून प्रवाशांची गैरसोय झाली आहे. चारचाकी,दुचाकी जाण्यासाठी देखील मार्ग न ठेवल्याने नाराजी व्यक्त होत आहे. एसटी वाहतूक देखील पर्यायी मार्गाने वळविण्यात आल्यानं शालेय विद्यार्थी व प्रवासी यांची गैरसोय निर्माण झाली आहे. त्यात वाहतूक पोलीस उपस्थित नसल्याने अधिकच गैरसोय झाली आहे. पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण यांना याबाबत विचारले असता तात्काळ पाहाणी करतो असे सांगितले.
मुख्याधिकारी सागर साळुंखे यांना याबाबत विचारले असता आयोजकांनी कार्यक्रमासाठी परवानगी घेतली आहे. पोलिस व वाहतूक पोलिसांशी पत्रव्यवहार केला आहे. वाहतूकीबाबतच्या अडथळा निर्माण होत असल्यास त्यावर तोडगा काढतो असं सांगितलं.