
बांदा : निगुडे नळ योजनेची मुख्य पाईपलाईन गेले १० - १५ दिवस झाले फुटून यासंदर्भात आपण सरपंच - ग्रामपंचायत अधिकारी यांना पत्रव्यवहार केल्याच गुरुदास गवंडे यांनी सांगितलं. परंतु दुरुस्तीसाठी ती घेतली असता पाईप दुसरीकडे आणि खोदकाम तिसरीकडे असा आरोप गवंडे यांनी केलाय. आपण ग्रामपंचायतीला सदर पाईपलाईन दुरुस्ती करण्यासंदर्भात पत्रव्यवहार केला आहे. त्याची दखल घेऊन पाईपलाईन दुरुस्त करण्यासाठी ग्रामपंचायतीने पुढाकार घेतला परंतु ही लाईन गेले १०-१५ दिवस फुटून झाले तरी यासंदर्भात ग्रामपंचायतीला काही लेणं देणं नाही असा आरोप गुरुदास गवंडे यांनी केला.
पाईप का फुटतात हे ग्रामसभेमध्ये सांगूनही त्या ठिकाणी एअरवॉल बसवण्यास ग्रामपंचायत प्रशासन दिरंगाई का करत आहे ? असा सवाल त्यांनी उपस्थितीत केलाय.