संघर्ष योद्धा ! ; महेश सारंग यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव

Edited by: विनायक गावस
Published on: October 25, 2023 15:01 PM
views 278  views

सावंतवाडी : भाजप जिल्हा सरचिटणीस तथा सिंधुदुर्ग जिल्हा बँक संचालक महेश सारंग यांचा वाढदिवस कोलगाव येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. भाजप नेत्यांसह हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी त्यांच्यावर सर्वस्तरातील मान्यवरांनी शुभेच्छांचा वर्षाव केला. कठीण जबाबदारी स्वीकारणारे महेश सारंग हे संघर्ष योद्धे आहेत‌. आगामी काळात जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ते जिल्ह्याच नेतृत्व करताना दिसतील अशा शुभेच्छा जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांनी दिल्या. अभिष्टचिंतन सोहळ्यात ते बोलत होते. 


मनिष दळवी म्हणाले, महेश सारंग यांनी जिल्हा बँकेची निवडणूक लढवली तो दुग्ध मतदारसंघ भाजपसाठी कठीण होता. मात्र, हाच मतदारसंघ त्यांनी निवडला. आ. नितेश राणे यांना हा मतदारसंघ भाजपकडे आणण्याचा शब्द त्यांनी दिला अन् जिंकला. मागच्या जिल्हा परिषद निवडणूकीत त्यांचा थोडक्या मतांनी पराभव झाला. मात्र, ते थांबले नाहीत. जनतेसाठी काम करत राहिले. कुशल संघटक म्हणून त्यांची ओळख आहे‌. तालुक्यात भाजप वाढण्यात त्यांचा वाटा मोठा आहे. आगामी काळात जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ते जिल्ह्याच निश्चितच नेतृत्व करतील असा विश्वास जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांनी व्यक्त करत महेश सारंग यांना शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी युवराज लखमराजे भोंसले शुभेच्छा देताना म्हणाले, महेश सारंग यांना आमचा पाठिंबा आहे. मनुष्य मोठा होतो तेव्हा त्याचे पाय ओढले जातात. पण, आपण घाबरू नका. आम्ही तुमच्या सोबत आहोत अशा शुभेच्छा लखमराजेंनी दिल्या.


यावेळी माजी नगराध्यक्ष संजू परब म्हणाले, महेश सारंग आणि संजू परब हे दोन भिन्न प्रवाह होते. ते भाजपसाठी लढत होते, मी कॉंग्रेससाठी. दोघेही आपलं काम करत होतो. कालांतराने एकाच पक्षात आलो. त्यानंतर ग्रामपंचायतीत आम्ही चांगलं यश मिळवलं. कार्यकर्त्यांना न दुखावणारा हा नेता आहे. महेश सारंग मोठ्या मनाचा कार्यकर्ता आहे अशी भावना संजू परब यांनी व्यक्त केली. राजकारणात मतभेद झाले तरी मैत्रीत कधीही दुरावा आला नाही. अपघातासह अनेक प्रसंग आले पण त्यावर मात केली. मैत्री कशी निभवावी ही त्यांच्याकडून शिकावं अशा शुभेच्छा खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष प्रमोद गावडे यांनी दिल्या‌. सरपंच, उपसभापती, जिल्हा बँक संचालक, भाजप सरचिटणीस असा चढात आलेख महेश सारंग यांचा आहे. त्यांचा राजकीय आलेख असाच चढता राहो अशा शुभेच्छा भाजप महिला अध्यक्षा श्वेता कोरगावकर यांनी दिल्या. उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त करत महेश सारंग यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. 


शुभेच्छांना उत्तर देताना महेश सारंग यांनी सर्वांचे आभार मानले. ते म्हणाले, भाजपचा प्रवास हा पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या माध्यमातून सुरु झाला. अनेक निवडणूकांना आपण सामोरे गेलो. ६३ गावांत पक्षाची बांधणी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विचार पोहचवला. नारायण राणे यांच्या केंद्रातील मंत्रीपदाच्या माध्यमातून गोरगरीबांना आधार देण्याच काम केलं. भाजप ही कार्यकर्त्यांची पार्टी आहे. त्यामुळे कुटुंबाला वेळ न देता पक्षाला अधिक वेळ दिला. अनेक प्रसंग आले पण त्यातून तुमच्या प्रेमामुळेच मात करू शकलो. तालुक्यात भाजप पक्ष मोठा होण आवश्यक आहे. आपल्यातील मतभेद राहता नये, ते दुर व्हायला हवे. मला आणि संजू परब यांना एका व्यासपीठावर आणण्याच काम मनीष दळवी यांनी केल. येणाऱ्या निवडणुका या भाजपच्या चिन्हावरच लढल्या जातील व  सावंतवाडीचा आमदार देखील भाजपच्या चिन्हावरच लढेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. 


याप्रसंगी जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी, युवराज लखमराजे भोंसले, माजी नगराध्यक्ष संजू परब, भाजप महिला जिल्हाध्यक्षा श्वेतल कोरगावकर, राजन म्हापसेकर, एकनाथ नाडकर्णी, अजय गोंदावळे, कोलगाव सरपंच संतोष राऊळ, उपसरपंच दिनेश सारंग, चंदन धुरी, चंद्रकांत जाधव, आरती माळकर, अशोक माळकर, मंदार कल्याणकर, दिलीप भालेकर, डॉ. अर्चना सावंत, अजय सावंत, प्रमोद गावडे, प्रियांका गावडे, प्रमोद कामत, गुरुनाथ पेडणेकर, रवींद्र मडगावकर, सुनील राऊळ, अन्नपूर्णा कोरगांवकर आदी उपस्थित होते. विविध सामाजिक, सहकार, शैक्षणिक क्षेत्रातील संघटनांकडून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.