मंजूर विकासकामे तात्काळ सुरू करावीत : महेश पांचाळ

Edited by: विनायक गांवस
Published on: January 06, 2024 12:24 PM
views 414  views

सावंतवाडी : खासकिलवाडा-ज्युस्तीनगर परिसरात मंजूर करण्यात आलेली विकासकामे तात्काळ सुरू करण्यात यावी अशी मागणी येथील भाजपचे पदाधिकारी महेश पांचाळ यांनी सावंतवाडी नगरपालिकेचे मुख्याधिकारी सागर साळुंखे यांची भेट घेऊन केली.

याबाबतचे निवेदन त्यांनी सागर साळुंखे यांना दिले. यावेळी त्यांच्यासोबत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते भाई देऊलकर, विलास सावंत आदी उपस्थित होते.