महेश कांदळगावकर यांनी घेतली आमदार नितेश राणेंची भेट

Edited by:
Published on: November 08, 2024 18:00 PM
views 223  views

कणकवली : महायुतीचे कणकवली देवगड वैभववाडी विधानसभा मतदारसंघाचे कमळ निशाणी वरील अधिकृत उमेदवार आमदार नितेश राणे  यांची  शिवसेना (शिंदे गट) जिल्हा संघटक माजी नगराध्यक्ष श्री.महेश कांदळगावकर यांच्यासह शिवसेना पदाधिकाऱ्यांनी भेट घेऊन विजयाच्या शुभेच्छा दिल्या.यावेळी उपजिल्हाप्रमुख श्री.एम.एम.सावंत, महिला जिल्हा प्रमुख श्रीमती सरिता राऊत,युवासेना जिल्हाप्रमुख श्री.मेहुल धुमाळे,उपतालुकाप्रमुख श्री.दामू सावंत,तालुका अध्यक्ष श्रीमती प्रिया टेमकर,शोभा बागवे,आदी उपस्थित होते.

महेश कांदळगावकर यांनी नुकताच शिवसेना शिंदे गटाच्या जिल्हा संघटक पदाचा कार्यभार स्वीकारला आहे. हा कार्यभार स्वीकारल्यानंतर ते कणकवली येथील शिवसेना कार्यालयात भेट देवून, बैठक घेऊन निवडणूक प्रचासंदर्भात आढावा घेतला. वेगवेगळ्या ठिकाणी भेटी गाठी देऊन सुद्धा त्यांनी प्रचार यंत्रणा सुरू केली.महायुतीचे उमेदवार आमदार नितेश राणे यांना प्रचंड बहुमताने निवडून देण्यात शिवसेना शिंदे गटाने कंबर कसली असून या कणकवली देवगड वैभववाडी मतदारसंघात नितेश राणे यांच्या विजयाची पताका रोवणार आणि त्यात शिवसेना शिंदे गटाचा सिंहाचा वाटा असेल असा विश्वास यावेळी  कांदळगावकर यांनी व्यक्त केला.