
कणकवली : गुरुवारी फोंडाघाट महाविकास आघाडी तर्फे साई मंदिर ते ग्रामपंचायत फोंडाघाट पर्यंत मशाल चिन्ह प्रज्वलित करून, लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रचार फेरी काढण्यात आली. यामध्ये शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर, महिला आघाडी जिल्हा संघटक नीलम पालव, तालुकाप्रमुख प्रथमेश सावंत, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट जिल्हा उपाध्यक्ष प्रा. दिवाकर मुरकर, ओबीसी सेल जिल्हा उपाध्यक्ष सुंदर पारकर, तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी अनंत पिळणकर, युवक राष्ट्रवादी कणकवली विधानसभा अध्यक्ष देवा पिळणकर, राष्ट्रीय काँग्रेस तालुका उपाध्यक्ष संतोष टक्के, ज्येष्ठ नेते आबू पटेल, युवासेना उपजिल्हाप्रमुख मुकेश सावंत, युवा सेना तालुकाप्रमुख उत्तम लोके, महिला आघाडी तालुका संघटक महिला माधवी दळवी, उप तालुका संघटक संजना कोलते, शिवसेना उपतालुकाप्रमुख राजू रावराणे, शिवसेना युवा सेना विभाग प्रमुख सिद्धेश राणे, रमेश चव्हाण, संदीप गावकर, शहर प्रमुख राजा पाटकर, सतीश मिस्त्री विजय जामकर पंकज राणे, सुहास ठुकरुल, रोहित राणे, विक्रम ठुकरूल, प्रसाद ठुकरुल, दत्तात्रय राने, सुरेश कदम, दादा राने, अनिल पटेल, सुरेश टक्के, शामू भुवड, महिला आघाडी सौ. अवसरे, कमलेश नारकर, गोटू राने, संदीप सुतार, शशिकांत सुतार, दर्शन मराठें, रवी शिंदे, कृष्णा एकावडे, भाई राणे, निलेश रावराणे, सचिन सुतार, रमेश राणे, प्रीतमराव रावराणे, अशोक लाड, सुदर्शन रासम, शिवप्रसाद तेंडुलकर, उत्तम तेली, महेश चव्हाण, तेजस पिळणकर, सुशांत शेलार, राजेश धुरी, शंकर राणे, दीपक राणे, शितल तोरस्कर, मानसी तोरस्कर, तन्वी तोरस्कर, स्वाती घाडी, आणि फोंडाघाट पंचक्रोशीतील शरद पवार गट- राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना उबाठा पक्षातील जुने जाणते कार्यकर्ते आणि मतदार या प्रचार फेरीत सहभागी झाले होते. ढोल- ताशा आणि विविध घोषणांनी बाजारपेठ दुमदुमली होती. शेवटी प्रचार फेरी ग्रामपंचायत फोंडाघाट येथे सर्वांनी शेवटचे तीन दिवस जागरूक राहून मशालीला मतदान करून घ्यावे. अशी अपेक्षा उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.