
कणकवली : महाराष्ट्र राज्यामध्ये विद्युत खाजगीकरणाच्या विरोधात बहुतांश संघटना आंदोलनात सहभागी झाले आहेत याच अनुषंगाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहुतांश महावितरणाचे कर्मचारी हे खाजगीकरणाच्या विरोधात संपात सहभागी झाले आहेत. कणकवली डिव्हिजन अंतर्गत येणारे
आउट सोर्सचे 87 टक्के लोक आहेत. तसेच डिपार्टमेंटचे 82 टक्के लोक संपामध्ये सहभागी झाले असल्याची माहिती महावितरणच्या अधिकाऱ्याने दिली.
पुणे मुंबई कोल्हापूर यासारख्या शहरातली वीज कर्मचारी संपावर गेल्यामुळे काही ठिकाणी विद्युत पुरवठा खंडित झाल्यानंतर तेथे ब्लॅकआऊट झाला आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 80 टक्के पेक्षा जास्त महावितरणचे कर्मचारी हे या संपात सहभागी झाल्यामुळे सिंधुदुर्गात कुठेही मोठ्या प्रमाणात विद्युत पुरवठा खंडित झाल्यास ब्लॅक आउट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.