
देवगड : देवगड तालुक्यातील तळेबाजार येथील महात्मा गांधी विद्यामंदिरच्या सिद्धिविनायक सभागृहामध्ये दातृत्व सोहळ्य संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर प्रशालेचे मुख्याध्यापक वाळके, प्रमुख अतिथी गिरकर, देसाई डॉक्टर,राजेंद्र खारडीयां सहकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थितीत होते. प्रास्ताविकातून प्रशालेचे मुख्याध्यापक वाळके यांनी आजच्या कार्यक्रमाचे स्वरूप आणि प्रमुख अतिथींची ओळख करून दिली.
दातृत्व म्हणजे केवळ देणगी किंवा वस्तू अर्पण करण्याचा कार्यक्रम नाही तर ती संवेदनशीलतेची आणि सामाजिक बांधिलकीची अभिव्यक्ती असते. दान हे श्रेष्ठ दान आहे. पण ते योग्य ठिकाणी दिलेलं दान हेच खरं दातृत्व असत.आणि हीच भावना जपली आहे. गिरकर, देसाई डॉक्टर आणि राजेंद्र खारडीयां यांनी विद्यार्थ्यांच्या हातातील मोबाईल जाऊन त्या ऐवजी पुस्तके कशी हातात येतील ह्या विचाराने डॉक्टर देसाई यांनी प्रशालेच्या वाचनालयासाठी पुस्तके खरेदी करण्यासाठी रोख रक्कम 2000/ रुपये, तसेच शाळेमध्ये विविध प्रकारचे उपक्रम होत असतात. त्यातील अलीकडेच झालेल्या तालुकास्तरीय विज्ञान मेळाव्यासाठी गिरकर यांनी रोख रक्कम 4000/ रुपये आणि विद्यार्थ्याचा उन्हाळ्यामध्ये तीव्र उन्हापासून बचाव व्हावा यासाठी राजेंद्र खारडीयां यांनी सीलिंग फॅन प्रदान केले. अशा दानशूर व्यक्तीचा शाल, श्रीफळ आणि पुष्प देऊन यथोचित सन्मान अनुक्रमे प्रशालेचे ज्येष्ठ शिक्षक कोकरे, सौ.परब आणि कदम यांच्या हस्ते करण्यात आला.
मनोगत मांडताना डॉक्टर देसाई म्हणाले की, शाळेसाठी कधीही कोणत्याही स्वरूपाची मदत लागली तर मी नेहमीच आपल्या सोबत असेन. आणि त्याचबरोबर इतरांनीही प्रशालेला लहान मोठ्या स्वरूपात का होईना परंतु मदत करावी असे आवाहन देखील केले. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जाधव यांनी केले तर आभार चनबसूगोळ यांनी मानले.