
देवगड : महात्मा गांधी विद्यामंदिर, तळेबाजार.चा एस. एस. सी. मार्च 2024 निकाल १००% लागला असून अनुक्रमे कु.समृद्धी संजय चव्हाण ४६२ ९३.८० % प्रथम क्रमांक आलाअसून व्दितीय क्रमांक 449 91.20 % कु. रिया गणेश मांडवकर हिचा आला आहे. तर तृतीय क्रमांक 90.60%,448 कु. पार्थ विनोद वाड्ये हिचा आला आहे. तर एकूण नियमित विद्यार्थी 81 विशेष प्राविण्य तर 36 प्रथम श्रेणी 37 व्दितीय श्रेणी 7 पास श्रेणी= 1 तसेच सेमी इंग्रजी निकाल 100% मराठी माध्यम 100% लागला आहे.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था अध्यक्ष श्री. संदिप शेठ तेली, उपाध्यक्ष श्री. राजेंद्र शेठ म्हापसेकर, खजिनदार श्री. संतोषजी वरेरकर, सर्व संस्था पदाधिकारी, प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. घोगळेसर, यांनी अभिनंदन केले आहे.