
सावंतवाडी : सावंतवाडीतील महादेव मंदिरात महाशिवरात्री निमित्त भक्तांनी गर्दी केली होती. मोठा उत्साह सकाळपासूनच पहायला मिळाला. विविध धार्मिक, आध्यात्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांच आयोजन या निमित्ताने करण्यात आले होते.
शहरातील ऐतिहासिक श्री देव पाटेकर मंदीरात युवराज लखमराजे व युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले यांच्या हस्ते पहाटे विधीवत अभिषेक पूजा संपन्न झाली. तदनंतर भाविकांसाठी दर्शन खुले करण्यात आले. गोवा, कर्नाटकातील भाविकांनीही दर्शनासाठी उपस्थिती लावली होती. तसेच माठेवाडा येथील आत्मेश्वर मंदीरात एकादशणी, अभिषेक पूजा संपन्न झाली. पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. महाआरती, भजन आदी कार्यक्रमांचे आयोजन यानिमित्ताने करण्यात आले होती. पोलिस लाईन येथील महादेव मंदिर, केसरी स्वयंभू मंदीर, माजगाव महादेव मंदिर, सपतनाथ मंदीर सातोळी आदींसह ठिकठिकाणी मोठ्या उत्साहात महाशिवरात्र साजरी करण्यात आली. धार्मिक, आध्यात्मिक कार्यक्रमांसह सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाले.