
दोडामार्ग : अगाथ महिमा असलेल्या तेरवण मेढे येथील श्री देव नागनाथचा महाशिवरात्र उत्सव अमाप उत्साहात आणि भविकांच्या अलोट गर्दीत सपन्न झाला. कोरोना महामारी निर्बंध संपल्यानंतर तब्बल ३ वर्षांनी झालेल्या महाशिवरात्र उत्सवाला श्री नागनाथ चरणी लीन होण्यासाठी पहाटे ४ वाजलेपासून सुरू झालेली भाविकांची अलोट गर्दी सायंकाळी ८ वाजेपर्यंत कायम होती. 'ओम नमः शिवाय आणि बम बम भोले' च्या नामघोषात अमाप उत्साह व भक्तिमय वातावरणात तेरवण मेढेत श्री देव नागनाथचा महाशिवरात्र उत्सव संपन्न झाला.
यावेळी स्थानिक देवस्थान समितीने प्रशासन व सोनावल हायस्कूलच्या सहकार्याने महाशिवरात्र निमित्त केलेलं चोख यात्रा नियोजन, बांधकाम खात्याने केलेलं खड्डेमुक्त रस्ते, पोलीस प्रशासनाने केलेले वाहतूक व पार्किंग व्यवस्थापन, एस. टी प्रशासनाने सोडलेल्या जादा गाड्या आणि आरोग्य विभागाने उभारलेला रुग्णसेवा कक्ष, तसेच वीज वितरणने तैनात केलेला कर्मचारी वर्ग यामुळे अलोट गर्दी लोटूनही तालुक्यातील सर्वात मोठा यात्रोत्सव सुरळीत व चैतन्यमय वातावरणात संपन्न झाला.
दोडामार्ग पोलीस निरीक्षक ऋषिकेश चौधरी, तहसिलदार अरुण खानोलकर, कसई दोडामार्ग नगराध्यक्ष चेतन चव्हाण, मनोज पार्सेकर, उद्योजक पिल्लई, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ प्रमुख शैलेश परब, उपजिल्हाप्रमुख बाबूराव धुरी, तालुकाप्रमुख संजय गवस, मदन राणे, श्रेयाली गवस, संदेश वरक, भाजप जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, सुधीर दळवी, प्रवीण गवस, मायकल लोबो आदींनी यात्रेनिमित्त श्री देव नागनाथचे दर्शन घेतल.
श्री देव नागनाथच्या सुसज्ज मंदिर उभारणीसाठी मोठ योगदान देणाऱ्या रामबाबू पतुरी, अल्लुरी कोंढाणा हरिनाथ यांनी महाशिवरात्रीला श्री देव नागनाथचे आशीर्वाद घेतल्यानंतर त्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करताना देवस्थान उपपसमितीचे अध्यक्ष देऊ गवस, सोबत प्रदीप गवस, मनोहर गवस, सुनील गवस यांसह आनंद तळनकर, भिवा गवस
देवस्थान समिती अध्यक्ष, तहसीलदार अरुण खानोलकर, पोलीस निरीक्षक अरुण खानोलकर, नगराध्यक्ष चेतन चव्हाण, शिवसेना सावंतवाडी विधानसभा मतदारसंघप्रमुख शैलेश परब, उपजिल्हाप्रमूख बाबुराव धुरी, तालुकाप्रमुख संजय गवस, भाजपचे राजन म्हापसेकर, सुधीर दळवी यांसह मोठ्या संख्येने विविध पक्षाचे पदाधिकारी भाविक भक्तगण यांनी हजेरी लावत श्री देव नागनाथ चे दर्शन घेतले.