राज्‍यातील शाळांमधील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची भरती आता कंत्राटी पद्धतीने

Edited by: स्वप्नील परब
Published on: July 03, 2025 18:10 PM
views 261  views

मुंबई :  मुंबई : राज्यातील शाळांमध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची भरती आता कंत्राटी पद्धतीने केली जाणार असल्याची अधिकृत घोषणा आज विधानपरिषदेत करण्यात आली. या निर्णयामुळे शाळांमध्ये शिपाई आणि इतर सहाय्यक पदांसाठी पारंपरिक कायमस्वरूपी भरतीऐवजी कंत्राटी पद्धतीचा अवलंब केला जाणार आहे. याची घोषणा शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी केली आहे.

राज्यातील सर्व शाळांमध्ये यापुढे फक्त शिपाई नाही तर सर्व चतुर्थ श्रेणी कर्मचारी हे कंत्राटी पद्धतीने भरण्यात येतील. या निर्णयापासून जे कर्मचारी आता आहेत ते निवृत्त होईपर्यंत राहतील पण त्‍यांची जागा रिक्‍त झाल्‍यावर त्यापुढे त्यांच्या जागेवर कंत्राटी कर्मचारी भरती केले जाणार अशी माहिती शिक्षण मंत्री दादा भूसे यांची विधान परिषदेत दिली. पुढे एका प्रश्नाचे उत्तर देताना शासन विद्यार्थ्यांची घटती पटसंख्या, शाळाबाह्य विद्यार्थी आणि शिक्षणाच्या गुणवत्तेसंदर्भात गंभीर असून सर्वंकष उपाययोजना राबवित आहे. यु-डायस प्रणालीच्या आकडेवारीनुसार विद्यार्थ्यांची संख्या काहीशी घसरलेली असली तरी त्यामागील कारणे समजून घेऊन योग्य ती कार्यवाही केली जात असल्याचे शालेय शिक्षण मंत्री यांनी अर्धातास चर्चेला उत्तर देताना सांगितले.