LIVE UPDATES

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे 2023 चे पुरस्कार जाहीर

सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष आबा खवणेकर यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली निवड
Edited by: प्रतिनिधी
Published on: January 07, 2023 12:35 PM
views 191  viewes

सिंधुदुर्ग : आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून व पत्रकार दिनानिमित्त पत्रकारीतेच्या माध्यमातून समाजातील वंचित घटकांना न्याय देऊन लोकशाही मजबुत करणाऱ्या पत्रकार बांधवांच्या लेखनीचा सन्मान म्हणून महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रकार बांधवांचा सन्मान करण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष आबा खवणेकर यांच्या अध्यक्षतेखाली निवड समितीने पुरस्कार प्राप्त पत्रकारांची नावे शुक्रवारी जाहिर केली.


पुरस्कार प्राप्त पत्रकारांची नावे पुढीलप्रमाणे:-


1) आदर्श पत्रकार पुरस्कार:-गोविंद शिरसाट दोडामार्ग


2) जीवनगौरव पुरस्कार :-कृष्णा सावंत कुडाळ


3) उत्कृष्ट शहरी पत्रकार पुरस्कार:-शिरीष नाईक दोडामार्ग


4) शोध पत्रकारिता पुरस्कार विष्णू चव्हाण:-आंबोली


5) उत्कृष्ट महिला पत्रकार पुरस्कार:-सौ.संजना हळदिवे कणकवली


6) उत्कृष्ट समाज सेवा पुरस्कार:-समिल जळवी कुडाळ


7) ज्येष्ठ पत्रकार पुरस्कार:- संजय भाईप सावंतवाडी


8) ज्येष्ठ पत्रकार कै. विजय राऊत स्मृती पुरस्कार:-अभिजीत पणदुरकर शिरोडा


9) *उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार:- विष्णू धावडे देवगड


10) *जेष्ठ पत्रकार कै.रणजीत गावडे स्मृती पुरस्कार:- मिलिंद धुरी कुडाळ


11) *ग्रामीण पत्रकार:-आनंद कांडरकर कुडाळ