
वेंगुर्ला : महाराष्ट्र बॉडीबिल्डर असोसिएशन आयोजित ६२ व्या महाराष्ट्र श्री २०२५ या मानाच्या स्पर्धेसाठी सिंधुदुर्ग बॉडी बिल्डर्स असोसिएशनच्या वतीने श्री सातेरी व्यायाम शाळा वेंगुर्ला येथे सिंधुदुर्ग जिल्हा निवड चाचणी संपन्न झाली. या स्पर्धेसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून ६ शरीर सौष्ठव पटूंची निवड करण्यात आली.
महाराष्ट्र श्री २०२५ या मानाच्या स्पर्धेसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून ५५ ते ६० किलो वजनी गटातून प्रथमेश कातळकर (कातळकर फिटनेस माणगाव), ६० ते ६५ किलो वजनी गटातून रोहित कुरमुळे (एम फिट जिम कुडाळ), ऋषिकेश कोडीयल (त्यागी फिटनेस सावंतवाडी), ६५ ते ७० किलो वजनी गटातून बाळा नार्वेकर (एम्पयर जिम कुडाळ), सलमान त्यागी (त्यागी फिटनेस सावंतवाडी) व ८० ते ८५ किलो वजनी गटातून संदेश सावंत (बांदेश्वर फिटनेस बांदा) यांची निवड करण्यात आली. तर संघ व्यवस्थापक म्हणून सुधीर हळदणकर (सावंतवाडी) व संघ प्रशिक्षक म्ह्णून अमोल तांडेल ( वेंगुर्ला) यांची निवड करण्यात आली.
निवड झालेला संघ हा उलवे, तालुका उरण, जिल्हा रायगड येथे होणाऱ्या नमो चषक तसेच सी. टी. आर. क्लासिक २०२६ या राज्य स्पर्धामध्ये सहभागी होणार आहे. निवड समिती मध्ये किशोर सोन्सूरकर, आंतरराष्ट्रीय पंच अमोल तांडेल, राज्य पंच सुधीर हळदणकर, राज्य पंच स्टेज मार्शल म्हणून अंकित सोनसुरकर यांनी काम पहिले. निवड झालेल्या संघांचे अभिनंदन सिंधुदुर्ग बॉडीबिल्डर्स अससोसिएशन चे अध्यक्ष शंकर कांबळी, उपाध्यक्ष जावेद शेख, उमेश कोदे, खजिनदार वसंत शेट्टी, सचिव किशोर शांताराम सोन्सूरकर, श्री सातेरी व्यायाम शाळा संचालिका अबोली किशोर सोन्सूरकर यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्या दिल्या.
यावेळी सिंधुदुर्ग श्री विजेते संतोष परब, सौ हळदणकर आदी उपस्थित होते. भविष्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बॉडी बिल्डर साठी विविध तालुक्यामध्ये स्पर्धा आयोजन करण्याबाबत चर्चा करण्यात आली.