
देवगड : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तेली समाज उन्नती मंडळाचा लक्षणिक उपोषण व इशारा आंदोलनास पाठींबा असल्याचे मत एकनाथ तेली जिल्हा अध्यक्ष महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज अशी माहिती जिल्हा अध्यक्ष महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज एकनाथ तेली, जिल्हा अध्यक्ष सिंधुदुर्ग जिल्हा तेली समाज उत्कर्ष मंडळ तुकाराम तेली,यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर पाठींबा व्यक्त केला.
यावेळी या आंदोलनाला जिल्हाध्यक्ष सिंधुदुर्ग जिल्हा बेलदार समाज अशोक पवार, माजी आम. प्रमोद जठार, काका कुडाळकर यांनी उपस्थित राहून पाठींबा दिला आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा ओबीसी व आरक्षित समाज राज्यघटनेनुसार दिलेले आरक्षण सुरक्षित रहावे.यासाठी चाललेल्या शांतता पूर्ण लक्षणिक उपोषण व इशारा आंदोलनास सिंधुदुर्ग जिल्हा तेली समाज उन्नती मंडळाचा पाठींबा आहे. कुडाळ येथे 23 व 24 सप्टेंबर रोजी सुरु असलेल्या लक्षणिक उपोषण व इशारा धरणे आंदोलनात सहभागी झाले होते. जे आमच्या हक्काचे आहे ते आम्हाला मिळाले पाहिजे या सनदशीर मागणीवर आपण ठाम आहोत. मराठा समाजाला कुणबी समाज मानून दिलेल्या आरक्षणाला आपला ठाम विरोध असून या बाबत काढलेल्या जी आर चा शासनाने फेर विचार करावा अशीहि मागणी केली आहे.










