
सावंतवाडी : कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक गावांवर आपला दावा करून सीमाभागातील मराठी बांधवांची अक्षरशः चेष्टा सुरू केली आहे. या वक्तव्याबद्दल निषेध आणि संबंधित घटनेच्या विरोधात पुढील रणनीती ठरवण्यासाठी सोमवारी २८ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता जिमखाना येथील हाॅटेल दळवी येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीस सर्व पक्षातील, विविध सामाजिक, शैक्षणिक संघटनेत काम करणाऱ्या व्यक्तींनी तसेच मराठी सीमावर्ती बांधवांनी उपस्थित राहावे, असे आवाहन महाराष्ट्र एकीकरण समितीचे जिल्हाध्यक्ष वसंत उर्फ अण्णा केसरकर यांनी केले आहे.