
कुडाळ : महाराष्ट्र राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत देण्यात येणारा राज्य सांस्कृतिक पुरस्कार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील तेंडोली येथील ज्येष्ठ दशावतारी कलावंत यशवंत (काका) तेंडोलकर यांना जाहीर झाला. त्यानिमित्ताने त्यांच्या तेंडोली येथील निवासस्थानी जाऊन भारतीय जनता पार्टी कुडाळ मंडळाच्या वतीने जिल्हा सरचिटणीस रणजित देसाई यांच्या हस्ते त्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी कुडाळ मंडळ अध्यक्ष संजय वेंगुर्लेकर, तेंडोली माजी सरपंच भाऊ पोतकर, रामचंद्र राऊळ, विष्णू तेंडोलकर, दिलीप राऊळ, प्रताप राऊळ, उमेश राऊळ, शशिकांत आरोलकर, नारायण राऊळ, नितीन राऊळ, सुनील सातार्डेकर व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.