महाराष्ट्र रेखाचित्र कर्मचारी संघटनेचा 2 नोव्हेंबरला सुवर्ण महोत्सवी सोहळा

Edited by: विनायक गावस
Published on: October 29, 2025 19:32 PM
views 116  views

सावंतवाडी : महाराष्ट्र राज्य रेखाचित्र शाखा कर्मचारी संघटनेचा सुवर्ण महोत्सवी सोहळा रविवार 2 नोव्हेंबर रोजी महाड, जिल्हा रायगड येथे विश्वास काटकर, सरचिटणीस राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र त्यांच्या अध्यक्षतेखाली होत आहे. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, रोजगार हमी, फलोत्पादन व खारभूमी विकास भरतशेठ गोगावले, एच.डी. दशपुते, सचिव सार्वजनिक बांधकाम विभाग, डॉ. संजय बेलसरे, सचिव जलसंपदा विभाग व लाभक्षेत्र विकास हे उपस्थित राहणार आहेत.


 हा कार्यक्रम भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक महाड  येथे सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत आयोजित करण्यात आला आहे. यावेळी महाराष्ट्र राज्य रेखाचित्र शाखा कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष जकी अहेमद जाफरी, उपाध्यक्ष रवींद्र बिंड व राहुल साळुंखे, सरचिटणीस सुधीर गभणे, अतिरिक्त सरचिटणीस विनायक जोशी, कोषाध्यक्ष सौ. वंदना परिहार, सहकोषाध्यक्ष अमोल सुपेकर यांची उपस्थित राहणार असल्याची माहिती संघटनेचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष राजू तावडे यांनी दिली. संघटनेच्या  सुवर्ण महोत्सवी सोहळ्याचे औचित्य साधून शनिवार दिनांक १ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता संघटनेच्या आजी व माजी सभासदांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार दिनांक २ नोव्हेंबर रोजी सकाळी ९  ते १० वा. सभासद नोंदणी, १०.३० वा. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन, ११.०० वा. मान्यवरांचे स्वागत व सत्कार, ११.३० वा. सरचिटणीस प्रास्ताविक करतील, ११.४० वा. संघटनेचे अध्यक्ष आपले मनोगत व्यक्त करतील, १२.०० वा. मान्यवरांच्या हस्ते स्मरणकेचे प्रकाशन, १२.१० वा. प्रमुख अतिथी यांच्या हस्ते सन्मानपत्र प्रदान, १२.३० वा. मान्यवरांचे व प्रमुख अतिथींचे मनोगत, दुपारी २.०० वा. स्नेहभोजन.  दुसऱ्या सत्रात दुपारी ३.०० वा. संघटनेचे पदाधिकारी यांचा सत्कार व त्यांचे मनोगत, सायंकाळी ४.३० वा. अध्यक्षीय भाषण, सायंकाळी ५.०० वा. आभार प्रदर्शन व कार्यक्रमाचा समारोप होईल. सुवर्ण महोत्सवी सोहळ्यात कोणतीही कमतरता राहू नये यासाठी कोकण कोअर कमिटीचे सर्व सदस्य अहोरात्र मेहनत घेत आहेत. कार्यक्रमाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.  तरी या कार्यक्रमासाठी संघटनेच्या सर्व सभासदांनी उपस्थित राहावे असे आवाहन स्वागताध्यक्ष नरेंद्र महाडिक  यांनी केली आहे. या कार्यक्रमासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातून मिळून अंदाजे ७०० सभासद उपस्थित राहण्याची शक्यता आहे, अशी माहिती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.