कुडाळ हायस्कूलचे कर्मचारी महादेव सोनवडेकर यांचं निधन !

Edited by: भरत केसरकर
Published on: November 29, 2023 16:36 PM
views 308  views

कुडाळ : कुडाळ हायस्कूलचे तृतीयश्रेणी कर्मचारी महादेव भिवा सोनवडेकर यांचे ड्युटीवर असतानाच हार्ट अटकेने निधन झाले. त्यातच त्यांचे वयाच्या ५९ व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांच्यावर अंत्यसंस्कार उद्या सकाळी त्यांच्या मूळ गावी सोनवडे येथे होणार आहे.

जिल्हा आणि तालुका शिक्षकेतर संघटनेचे ते सदस्य होते. त्यांच्या कुटुंबीयांवर कोसळलेल्या दुःखाच्या डोंगरात सहभागी असल्याचे सांगत शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे अनिल राणे, गजानन नानचे यांच्यासह प्रसाद पडते यांनी दुःख व्यक्त केले आहे.