महादेव जानकरांचा संभाजी भिडेंवर प्रहार...!

Edited by: भरत केसरकर
Published on: August 01, 2023 19:30 PM
views 142  views

कुडाळ : रासपचे आमदार महादेव जानकर यांनी कुडाळ येथे पत्रकार परिषद घेत संभाजी भिडे यांच्यावर जोरदार टिका केली. वारंवार युग पुरुषांवर बोलून संभाजी भिडेंकडून त्यांचा अपमान केला जातोय. भिंडेना यातून काय अभिप्रेत आहे ? समाजा समाजामधे त्यांना भांडण लावायची आहेत का?असा प्रश्न पडतो. त्यामुळे संभाजी भिडेंवर योग्य ती कारवाई शासनाने करावी अशी राष्ट्रीय समाज पक्षाची मागणी आहे असे जानकर यांनी स्पष्ट केल.

जनतेच्या दरबारात गेल्यावर भाजपला याची शिक्षा मिळेल. भाजपला वाटत असेल मांजर डोळे झाकून दुध पितेय मात्र जनतेला हे माहीत आहे. अजित पवारांना सोबत घेणं जनतेला पटलेल नाही. काहीही करून सत्ता आपल्याकडे राहावी असं भाजपला वाटत आहे. मात्र जनता याला खीळ घातल्या शिवाय राहणार नाही.

आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणूका राष्ट्रीय समाज पक्ष स्वबळावर लढणार आहे. महाविकास आघाडीने अजून आम्हाला काही सांगितले नाही. ना विश्वासात घेतलं आहे. त्यामुळे सध्यातरी आम्ही स्वबळावर निवडणूक लढवणार आहोत.यावरून आगामी काळात महाविकास आघाडी सोबत जाण्याचे संकेत जानकर यांनी दिले आहेत.यावेळी रासपचे जिल्हाध्यक्ष अॅड.किशोर वरक, रासपची जिल्हा कार्यकारणी चे पदाधिकारी उपस्थित होते.