विजयदुर्गात महा रक्तदान - मोफत नेत्र तपासणी शिबीर !

Edited by: नागेश दुखंडे
Published on: March 19, 2024 10:36 AM
views 266  views

देवगड : विजयदुर्ग ग्रामविकास मंडळ आयोजित व विजयदुर्ग पोलिस ठाणे आणि रामेश्वर, गिर्ये, विजयदुर्ग पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थ, शिवप्रेमी यांचे वतीने, मोफत नेत्र तपासणी आणि महा रक्तदान शिबिर विजयदुर्ग पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात विजयदुर्ग पोलीस ठाणे सभागृह येथे यशस्वीपणे पार पडले. 

महा रक्तदान शिबिराची सुरूवात, प्रथम धन्वंतरी देवाला आवाहन, पुजा व गाऱ्हाणे, श्रीफळ वाढवून झाली.

सदर महा रक्तदान शिबिराचे, विजयदुर्ग ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत बिडये , विजयदुर्ग पोलिस ठाणेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक मनोज सोनवलकर , विजयदुर्ग ग्रामपंचायत प्रभारी सरपंच रियाज काझी, गिर्ये ग्रामपंचायतचे सरपंच लता गिरकर, रामेश्वर ग्रामपंचायत सरपंच मोनिका पुजारे टूकरूल, माजी जिल्हा परिषद सदस्या वर्षा पवार, पंचायत समिती सदस्या शुभा कदम, मंडळाचे मुख्य सल्लागार राजेंद्र परुळेकर, डॉ. संग्राम निकम, जेष्ठ महिला नागरिक मंगल मणचेकर, या मान्यवरांच्या शुभहस्ते दिप प्रज्वलित करण्यात आले.

महा रक्तदान शिबिराला येणाऱ्या रक्तदात्यांची नाव-नोंदणी करुन, महा रक्तदान शिबिराला वय वर्षे ५० च्या खाली असणाऱ्यांचे रक्त संकलित करण्यात आले. यामध्ये महिला-पुरुष रक्तदात्यांबरोबरच विजयदुर्ग पोलिस स्टेशनचे अधिकारीवर्ग, विजयदुर्ग एस.टी. आगार कर्मचारी तसेच रामेश्वर, गिर्ये, विजयदुर्ग पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन, रक्तदान करुन समाजोपयोगी कार्य संपन्न केले, त्यामध्ये तरुणवर्ग व महिलांचा सहभाग उल्लेखनीय होता.

विजयदुर्गचे डॉ. संग्राम निकम, गिर्यें मेडिकलचे विनायक पडवळ यांनी सर्वप्रथम रक्तदान केले, विजयदुर्ग पंचक्रोशीतील आलेले रक्तदाते तसेच गिर्ये ग्रामपंचायत माजी सरपंच रुपेश गिरकर, रामेश्वर ग्रामपंचायतचे माजी सरपंच विनोद सुके, विजयदुर्ग ग्रामपंचायत सदस्या सौ वैशाली किर तसेच रामेश्वर ग्रामपंचायतच्या महिला सरपंच सौ मोनिका पुजारे टूकरुल यांनी रक्तदान करून सर्वांसमोर आदर्श ठेवला.

रक्तदान शिबीरावेळी विजयदुर्ग ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच महेश बिडये व जि. प. प्राथमिक शाळेचे शीतल देवरकर यांनी सदिच्छा भेट दिली. महा रक्तदान शिबिरामध्ये ३० रक्तदात्यांनी रक्तदान केले. सहभागी झालेल्या रक्तदात्यांचे मंडळाच्या वतीने प्रशस्तीपत्र, गुलाबफुल, नवीन वर्ष कॅलेंडर तसेच त्यांना महाराष्ट्र राज्य रक्त संक्रमण परिषद(SBTC) संस्थेचे रक्तपेढी जिल्हा रुग्णालय-सिंधुदुर्ग यांच्या वतीने रक्तदात्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.

सदर उपक्रमावेळी विजयदुर्ग पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक मनोज सोनवलकर यांनी रक्तदान म्हणजे मोठे कार्य याचा उल्लेख करत, विजयदुर्ग ग्रामविकास मंडळ, विजयदुर्ग पंचक्रोशीसाठी करत असलेल्या समाजोपयोगी कार्याचे कौतुक केले तसेच येणाऱ्या मतदानाला सर्व मतदात्यांनी आपला मतदाचा हक्क बजवावा असे सांगितले.

विजयदुर्ग ग्रामविकास मंडळ व महाराष्ट्र राज्य रक्त संक्रमण परिषद(SBTC) संस्थेचे रक्तकेंद्र व रक्त विघटन केंद्र जिल्हा रुग्णालय-सिंधुदुर्ग वतीने विजयदुर्ग ग्रामविकास मंडळ आरोग्य विभागात करत असलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल प्रशस्तीपत्र व गौरवचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

गिर्ये ग्रामपंचायतचे सरपंच व महाराष्ट्र राज्य रक्त संक्रमण परिषद(SBTC) संस्थेचे रक्तपेढी जिल्हा रुग्णालय-सिंधुदुर्ग यांचा मंडळाच्या वतीने शाल, नारळ व पुष्पगुच्छ, छत्रपती शिवाजी महाराज ३५० वा शिवराज्याभिषेक सोहळा विशेष प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला.

नैब नेत्र रुग्णालय देवगड, नेत्र तपासणी टीमचे तसेच रक्तदान शिबिरासाठी पुढाकार घेऊन सहकार्य करणारे गिर्ये ग्रामपंचायतचे माजी सरपंच रुपेश गिरकर यांचा मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला.

*सदर महा रक्तदान शिबिराला विशेष सहकार्य करणारे डॉ. सुनिल आठवले मेडिकल फाऊंडेशन देवगड, विजयदुर्ग पोलिस ठाणे, विजयदुर्ग, रामेश्वर गिर्ये ग्रामपंचायत, विजयदुर्ग ग्रामविकास मंडळाचे सर्व पदाधिकारी, सदस्य, विजयदुर्ग पंचक्रोशीतील ग्रामस्थ तसेच संपुर्ण सहकार्य करणारे आपले सर्व मित्र, मंडळे, रक्तदानसाठी सहभागी झालेले सर्व रक्तदाते, आभार मानण्यात आले, विजयदुर्ग ग्रामविकास मंडळाच्या आठव्या वर्धापन दिनानिमित्त केक कापण्यात आला.

या सदर महा रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी मंडळाचे  चंद्रकांत बिडये (मुंबई-अध्यक्ष) राजेंद्र परुळेकर(मुख्य सल्लागार)

योगिता परुळेकर(गाव-सचिव) शैलेश खडपे(मुंबई-सचिव) नरेंद्र उपरकर(मुंबई- कार्याध्यक्ष) राजाराम सकपाळ(गाव-कार्याध्यक्ष) छाया पटेल (सहसचिव) अभिजीत जावकर(उपाध्यक्ष)  बाळगौरव मणचेकर(सदस्य) विश्वनाथ गडकर(सदस्य) गौरी मणचेकर(सदस्या) संपदा पिळणकर(सदस्या) उदय पवार मंगल चंद्रमोहन मणचेकर आनंद देवरुखकर तसेच मंडळाचे माजी अध्यक्ष अविनाश गोखले यानी सहकार्य केले.