
सावंतवाडी : व्हि.पी.कॉलेज ऑफ फार्मसी माडखोलच्या बी.फार्म 2024 च्या अंतिम वर्षाच्या 10 विद्यार्थ्यांची मॅन्युफॅक्चरींग, प्रोडक्शन व पॅकेजिंग डिपार्टमेंटसाठी महाविद्यालयाच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेल मार्फत गोव्यातील इनक्युब इथिकल्स प्रा.लि या फार्मा कंपनीमध्ये निवड झाली.
कॉलेजच्या ट्रेनिंग अॅण्ड प्लेसमेंट सेल या विभागाकडून 6 जुलै 2024 च्या पहिल्या टप्प्यात 15 विद्यार्थ्यांची निवड झाली होती. त्यानंतर 27 जुलै 2024 रोजी घेण्यात आलेल्या प्लेसमेंट ड्राईव्ह मध्ये 10 विद्यार्थ्यांची निवड झाली. या विद्यार्थ्यांना संस्थेचे प्रशासकीय अधिकारी पंकज पाटील महाविद्यालयीन प्राचार्य डॉ सुनील शिंगाडे आणि प्लेसमेंट ऑफिसर व एचऒडी डॉ संदेश सोमनाचे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या विद्यार्थ्यांचे संस्थेचे आधारस्तंभ व प्रेरणास्थान माजी कुलगुरू डॉ वेदप्रकाश पाटील व संस्थेचे कार्याध्यक्ष आमदार डॉ राहुल पाटील यांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.