
सावंतवाडी : नेमळे पंचक्रोशी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय नेमळे शाळेचा दहावी २०२३/२४ चा निकाल १०० टक्के लागला. यात प्रथम . प्रणया परशुराम राऊळ ९६ टक्के, द्वितीय काजल राजाराम घोंगे ९४.४० टक्के तर तृतीय कुआर्यन अरविंद गोवेकर ९२.६० टक्के गुण मिळवून प्राप्त केला. चतुर्थ वैभवी दीपक वजराटकर ९०.८० व पंचम भाग्यश्री अशोक पांगम ८७ टक्के गुण मिळवून प्राप्त केला. २५ विदयार्थी विशेष प्रविण्य श्रेणीत उत्तीर्ण झाले सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेनं अभिनंदन केले.